Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पवार, तटकरेंचा नवा कारमाना उघड

पवार, तटकरेंचा नवा कारमाना उघड

  • सिंचनाचे ८०० कोटी पाण्यात
  • १०८ बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार
  • भुजबळ परिवारासह, तटकरे आणि पवारांवर होणार कारवाई

ajit pawar, sunil tatkareमुंबई, [२३ ऑक्टोबर] – ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा नवा कारनामा उघड झाला असून, या दोघा नेत्यांच्या बेनामी आणि बोगस अशा १०८ कंपन्यात ८०० कोटी रुपये परस्पर लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याभोवतीचा गुंता अधिक वाढला आहे.
या पार्श्‍वभूमीवर अजित पवार आणि तटकरे यांना लवकरच कारवाईला सामोरे जावे लागेल असे दिसून येत असून, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ परिवारावरही कारवाई होणार असल्याचे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.
खासदार सोमय्या यांनी शुक्रवारी मंत्रालयात पत्रपरिषदेत सिंचनातील घोटाळ्याची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईतील युनियन बँकेमधील एफ. ए. कन्स्ट्रक्शनच्या खात्यातून ८०० कोटी रुपये काढण्यात आले असून, ती तटकरे आणि अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या १०८ बोगस कंपन्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या १०८ कंपन्या बेनामी, बोगस आणि अस्तित्वातच नसलेल्या आहेत. या घोटाळ्यांबरोबरच तटकरे यांनी रायगड येथील कोंडाणे धरणासाठी १६० कोटींची बोगस बिलेही बनविली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय आणि युनियन बँकेचे मुख्याधिकारी अरुण तिवारी यांच्याबरोबर मागील चार दिवसांत आपण विविध विभागातल्या अधिकार्‍यांची भेट घेऊन, या घोटाळ्याची माहिती घेतली आहे. तिवारी यांनी बँकेच्या विभागांतर्गत चौकशीला सुरुवात केली आहे. पण एवढी रक्कम काढली जात असताना, बँकेचे अधिकारी काय करीत होते, हा प्रश्‍न शिल्लक राहतोच. कोणीही खातेधारक बँकेतून १० लाखांच्या वर रक्कम काढत असेल, तर त्याबाबत इन्कमटॅक्स विभागाला कळवावे लागते. तसे का केले गेले नाही, याचीही चौकशी सुरू झाली आहे. त्याबरोबर या घोटाळ्याप्रकरणी अनेक मासे जाळ्यात अडकणार आहेत, असे सोमय्या म्हणाले.
या घोटाळ्यात प्रत्यक्ष संबंध असल्यानेच अजित पवार आणि सुनील तटकरे चौकशीसाठी एसीबीसमोर येत नव्हते. मोठमोठ्या वकिलांमार्फत ते वेळ मारून नेत होते. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बजावलेल्या अंतिम नोटिसीमुळे त्यांना एसीबीसमोर चौकशीसाठी हजर राहावेच लागले. आपला संबंधच नाही, असे म्हणणारे अजित पवार आणि सुनील तटकरे आता या घोटाळ्याबाबत कबुली द्यायला लागले आहेत. एकूणच अजीत पवार आणि सुनील तटकरे यांच्या अवतीभोवती सिंचन घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.
अधिकार्‍यांवर खापर
अजीत पवार आणि सुनील तटकरे हे अधिकार्‍यांकडे बोट दाखवत आहेत आणि अधिकारी त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत, असे सोमय्या यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांची अधिकार्‍यांवर खापर फोडण्याची मानसिकता अजूनही कायम आहे. तसेच, या प्रकरणी जलद गतीने तपास व्हायला अन्य तपास यंत्रणांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25280

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1292 of 2451 articles)


धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यात मुख्यमंत्री बाबासाहेबांचे विचार देशाला तारू शकतात नागपूर, [२३ ऑक्टोबर] - दीक्षाभूमी विकासाचा मास्टर प्लॉन तयार होत ...

×