पशुपतिनाथ मंदिराजवळ मृतांवर अंत्यसंस्कार
Tuesday, April 28th, 2015काठमांडू, [२७ एप्रिल] – नेपाळमध्ये भूकंपाच्या प्रलयातील मृतांचा आकडा प्रत्येक तासाला वाढतच आहे. इमारतीच्या ढिगार्याखाली अनेक लोक गाडले गेले असून त्यांची वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. मृत्यू झालेल्यांवर काठमांडूमध्ये सामूहिक अंत्यसंस्कार सुरु आहेत.
नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे भूकंपात ३२०० वर लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही. बेपत्ता झालेल्यांच्या सुखरूप असण्याची शक्यता मावळत आहे. तर दुसरीकडे अनेक बेवारस मृतदेह सडू लागल्याने काठमांडूमध्ये आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांवर काठमांडूमध्ये सामूहिक अंत्यसंस्कार सुरु आहेत. पशुपतीनाथ मंदिराजवळ सामूहिक अंत्यसंस्कार सुरु आहेत.
एकीकडे नेपाळच्या लष्कराच्या सोबतीला भारतीय सैन्य आणि एनडीआरएफची टीम बचावकार्यात आहे. चीनच्या बचाव पथक यांनी काठमांडूचे गल्लीबोळ पिंजून अनेकांना जीवनदान दिले आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22315

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!