Home » ठळक बातम्या, वाणिज्य » पहिले डिस्प्ले डेबिट कार्ड बाजारात

पहिले डिस्प्ले डेबिट कार्ड बाजारात

=ऍक्सिस बँकेचा पुढाकार=
axis display cardमुंबई, [३ डिसेंबर] – ऍक्सिस या देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या खाजगी बँकेने एनआरआय खातेधारक प्रवासी भारतीय ग्राहकांसाठी डिस्प्ले असलेले डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. यामुळे आता आर्थिक व्यवहारांदरम्यान एसएमएसद्वारे वन टाईम पासवर्ड मिळवण्याची गरज राहणार नाही.
या डिस्प्ले कार्डमध्ये ईएमव्ही चिप, डिस्प्ले स्क्रीन आणि टच सेन्सिटीव्ह बटन लावण्यात आले असून, यामुळे कार्डवरच ओटीपी जनरेट करता येईल. ग्राहकांचा युझर आयडी आणि पासवर्ड याचे कॉम्बिनेशन करून तयार झालेल्या या पासवर्डच्या साहाय्याने ग्राहकांना इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार करता येतील. अशा प्रकारचे डिस्प्ले कार्ड बनवणारी ही पहिलीच बँक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, याकरिता किती शुल्क आकारण्यात येणार आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25992

Posted by on Dec 5 2015. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (1082 of 2455 articles)


=१५ वर्षे जुन्या बस, ट्रकवर बंदीचा विचार नाही, प्रदूषण रोखण्यासाठी सर्वंकष धोरण: नितीन गडकरी= नवी दिल्ली, [४ डिसेंबर] - दहा ...

×