Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

=बिहार विधानसभा निवडणूक, नामांकन प्रक्रिया सुरू=
bihar-electionsनवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज बुधवारपासून सुरू झाली. सोबतच, भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली. यात ४३ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत स्थान न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे दोन विद्यमान आमदार अमन पासवान आणि अजय मंडल यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात आहेत.
२४३ सदस्यीय विधानसभेच्या येत्या १२ ऑक्टोबर रोजी होणार्‍या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना आज बुधवारी जारी करण्यात आली. यासोबतच, या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची औपचारिक प्रक्रियाही आता सुरू झाली आहे. पाच टप्प्यांत ही निवडणूक होत असून, शेवटच्या टप्प्याचे मतदान ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर, ८ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
जागावाटप करण्यात जदयु-राजद-कॉंग्रेस यांचा समावेश असलेल्या आघाडीने बाजी मारल्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात भाजपाने आघाडी घेतली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ५० टक्के उमेदवार महिला आहेत. तसेच युवकांनाही स्थान देण्यात आले आहे. ६० टक्के उमेदवार अनुसूचित जाती, जमातीचे आहेत. आणि ५ उमेदवार हे यादव जातीचे आहेत. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मतांचे विभाजन करण्यासाठीच भाजपाने ही राजकीय खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे.
भाजपाच्या यादीत २६ विद्यमान आमदारांचा समावेश असून, तीन आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. समाजातील सर्वच घटकांना योग्य स्थान मिळावे, यावर आम्ही विशेष भर दिला असल्याची माहिती नड्डा यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23831

Posted by on Sep 17 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1464 of 2452 articles)


=भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] - ईशान्य भारत हा भारताचा अविभाज्य भाग आहे, आणि ...

×