पहिल्या टप्प्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Monday, November 30th, 2015=मुंबईत लागणार १२५० सीसीटीव्ही कॅमेरे=
मुंबई, [२९ नोव्हेंबर] – येथील सुरक्षितता अधिक भक्कम करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतुकीचे नियंत्रण करणे तसेच तपास यंत्रणेस मदत होण्यासाठी शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणार्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता येथील ताजमहल हॉटेल, कुलाबा येथे होणार असल्याची माहिती गृह विभागाने दिली आहे.
या कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे, गृह राज्यमंत्री (शहर) डॉ. रणजीत पाटील, मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद, पोलिस गृहनिर्माण व कल्याण मंडळाचे महासंचालक सतीश माथूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण मुंबईत जागतिक दर्जाचे व उच्च क्षमता असलेले सुमारे ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळी दरम्यानच्या संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १२५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे ३ नियंत्रण कक्ष राहणार आहेत. या प्रकल्पात वाहनांचे नंबर प्लेट डिटेक्शन, व्हिडीओ नालिटिक्स तसेच १००० पोलिस वाहनांच्या जीपीएस ट्रॅकिंगची सुविधा राहणार आहे. या पहिल्या टप्प्यातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी होत आहे.
या प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्याचे काम एप्रिल, २०१६ मध्ये तर तिसर्या व अंतिम टप्प्याचे काम ऑक्टोबर २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे. हे काम एल ऍन्ड टी कंपनी मार्फत करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मेसर्स प्राईस वॉटर हाऊस कुपर्स हे आहेत.
या प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादी कारवायांवर देखरेख ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण करणे व वाहतुकीला शिस्त लावण्यास मदत होणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी दिली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25863

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!