Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » पहिल्या टप्प्यात ५८६ उमेदवार रिंगणात

पहिल्या टप्प्यात ५८६ उमेदवार रिंगणात

bihar election1पाटणा, [२६ सप्टेंबर] – पाच टप्प्यांत होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीत १२ ऑक्टोबर रोजीच्या पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघात होणार्‍या मतदानासाठी आज शनिवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. ही मुदत संपल्यानंतर पहिल्या टप्प्यासाठी एकूण ५८६ उमेदवार रिंगणात आहेत.
पहिल्या टप्प्यात होणार्‍या निवडणुकीसाठी एकूण ६०५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १९ उमेदवारांनी शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. लक्ष्मणन् यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. समस्तीपूर जिल्ह्यातील मोरवा आणि मोईनुद्दिननगर या दोन मतदासंघांमध्ये सर्वात जास्त म्हणजे प्रत्येकी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नवादा जिल्ह्यातील वरसालीगंज आणि बेगुसराय जिल्ह्यातील तेघरा या मतदारसंघात अनुक्रमे सहा आणि सात उमेदवार रिंगणात आहेत.
पहिल्या टप्प्यात एकूण १० जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसरीकडे दुसर्‍या टप्प्यात सहा जिल्ह्यांमधील ३२ मतदारसंघांमध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी एकूण १०० उमेदवारांनी शनिवारी अर्ज भरले, असेही लक्ष्मणन् यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री व हिंदुस्थान अवामी पक्षाचे नेते जीतनराम मांझी यांनी इमामगंज मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मांझी यांची लढत मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांच्याशी होणार आहे. नितीश कुमार यांचा पराभव हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे मांझी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24071

Posted by on Sep 27 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1401 of 2452 articles)


=पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन= संयुक्त राष्ट्रसंघ, [२६ सप्टेंबर] - दहशतवादाला धर्मापासून वेगळे करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान ...

×