Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » पाकची अण्वस्त्रे चोरी जाण्याची शक्यता

पाकची अण्वस्त्रे चोरी जाण्याची शक्यता

=अमेरिकेच्या अहवालात इशारा=
usa-flag-mapवॉशिंग्टन, [२२ मार्च] – भविष्यातील संभाव्य युद्धात भारताविरोधात वापर करण्यासाठी पाकिस्तान एकीकडे अण्वस्त्र व क्षेपणास्त्रांचा साठा जमा करीत असताना, पाकची अण्वस्त्रे चोरीला जाण्याची जोखीम फार जास्त असल्याचा इशारा अमेरिकेच्या अण्वस्त्र दहशतवादावरील अहवालातून देण्यात आला आहे.
याच महिन्याच्या अखेरीस अण्वस्त्र सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होत आहे. या पार्श्‍वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. पाकची अण्वस्त्रे सुरक्षित नसून, त्यांची चोरी होण्याची आणि ते अतिरेक्यांच्या हातात पडण्याची शक्यता फार जास्त बळावली आहे, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे.
अण्वस्त्रांचा मोठा साठा करण्याच्या दिशेने पाकच्या हालचाली अतिशय वेगाने सुरू आहेत. ही देखील धोक्याची सूचनाच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांची सुरक्षा करण्याची पाकची क्षमता नसल्याने ते चोरीला जाऊ शकतात. स्पष्टच शब्दात सांगायचे झाल्यास, नजीकच्या भविष्यात जास्त धोका नसला तरी, या काही वर्षांच्या काळात पाकिस्तानचे संपूर्ण नियंत्रण अण्वस्त्रांच्या बळावर अतिरेक्यांच्या हातात जाण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, असा इशाराही यातून देण्यात आला.
अण्वस्त्रांचा मोठा साठा तयार करण्याच्या पाकच्या हालचाली आणि या देशातील ढासळती कायदा व सुव्यवस्थेसोबतच अतिरेकी संघटनांना पाकमधील राज्यकर्त्यांचे वाढते पाठबळ या सर्वच बाबी अतिशय चिंताजनक आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27527

Posted by on Mar 23 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (592 of 2458 articles)


=मेहबुबा मुफ्ती यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट= नवी दिल्ली, [२२ मार्च] - पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आज मंगळवारी सकाळी ...

×