Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकची ‘ती’ बोट; संरक्षण मंत्रालय ठाम

पाकची ‘ती’ बोट; संरक्षण मंत्रालय ठाम

  • पुरावे सादर करणार : पर्रिकर
  • तटरक्षक दलाच्या डीआयजींना नोटीस

parrikar_manohar3नवी दिल्ली, [१८ फेब्रुवारी] – गुजरातच्या पोरबंदर येथील समुद्रात भारताच्या सीमेपर्यंत आलेल्या पाकिस्तानी नौकेत झालेल्या स्फोट प्रकरणी तटरक्षक दलाच्या महानिरीक्षकांच्या वक्तव्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असतानाच, संरक्षण मंत्रालय आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्टीकरण संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले असून, यासंबंधीचे पुरावे सादर करणार असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानातून आलेली ती संशयित बोट उडवून देण्याचा आदेश आपणच दिला होता, असा दावा तटरक्षक दलाचे महानिरीक्षक लोशाली यांनी केला होता. राष्ट्रीय दैनिकाच्या व्हिडीओत त्यांचे यासंदर्भातील वक्तव्य बुधवारी प्रसारित झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, माध्यमांमधून हे वृत्त प्रसारित होताच लोशाली यांनी आपल्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे. आपण असे काही बोललोच नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री मनोर पर्रिकर हे आपल्या वक्तव्यावर ठाम असून, यासंदर्भात आपण लवकरच ठोस पुरावे सादर करू, असे त्यांनी सांगितले.
३१ डिसेंबर २०१४ रोजी गुजरातच्या पोरबंदर किनार्‍याजवळ आलेली पाकिस्तानी बोट प्रचंड स्फोटानंतर बुडाली. या घटनेनंतर दोन महिन्यांनी एक व्हीडीओ समोर आल्याने संरक्षण मंत्रालयाची झोप उडाली आहे. या व्हीडीओमुळे सरकार आणि तटरक्षक दलाची परस्पर विरोधी भूमिका समोर आली आहे. एका इंग्रजी दैनिकाने हा व्हिडीओ जारी केला, ज्यात कोस्टगार्डच्या डीआयजींनी ‘ती’ बोट आपल्याच आदेशाने उडवून दिल्याचा दावा केला आहे. आता खुद्द डीआरजी लोशाली यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले असून लोशाली यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संरक्षण मंत्रालय आपल्या वक्तव्यावर कायम आहे, असे पर्रिकर यांनी स्पष्टपणे सांगितले. डीआयजींच्या वक्तव्याची सखोल चौकशी होईल आणि आमच्याकडे असलेले पुरावे सादर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे सरकारने तटरक्षक दलाच्या महानिरीक्षकांना वादग्रस्त वक्तव्याबद्दल कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. पाकच्या ‘त्या’ नावेत दहशतवादीच होते आणि त्यांनी स्वत:हूनच ती बोट उडवून दिली होती, असे सरकारचे म्हणणे आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20696

Posted by on Feb 19 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2042 of 2453 articles)


सूरत, [१८ फेब्रुवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नवी दिल्ली येथील भेटीदरम्यान परिधान ...

×