Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पाकचे हेरगिरी जाळे तोडणार : पर्रीकर

पाकचे हेरगिरी जाळे तोडणार : पर्रीकर

manohar-parrikar9जयपूर, [१६ जानेवारी] – पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयने भारतातील सशस्त्र दलांमध्ये आपले हेरगिरीचे जाळे विणले आहे. ते पूर्णपणे नष्ट करून, सशस्त्र जवान आयएसआयच्या जाळ्यात अडकणार नाही, यासाठी आपले मंत्रालय ठोस पावले उचलत असल्याची माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज शनिवारी येथे दिली.
लष्कर आणि सशस्त्र दलांतील कनिष्ठ स्तरांवरील काही जवान आयएसआयच्या हेरगिरी जाळ्यात अडकले आहेत. वरिष्ठ पातळीवर कोणताही अधिकारी फितूर झालेला नाही. तथापि, हे जाळेच नष्ट करणे आवश्यक आहे, असे पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अंबर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या संकुलात लष्कर भरती रॅलीचे उद्‌घाटन पर्रीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आपण जेव्हा पूर्णपणे सतर्क असतो, तेव्हा अशा प्रकारचे जाळे तोडणे सहज शक्य होत असते. त्यामुळे प्रत्येकच वेळी आपण सतर्क राहायलाच हवे. जवानांच्या भरती आणि प्रशिक्षणाच्या काळातच आम्ही आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज असते. याशिवाय, सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा धोका हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही निर्धारित करण्यात आलेली आहेत, असे संरक्षण मंत्री म्हणाले.
या भरती रॅलीकरिता आम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया हाती घेतली होती. यामुळे उमेदवारांची संख्या कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण, उलट उमेदवारांची संख्या वाढली आहे. भारतीय तरुण हे देशभक्त आणि राष्ट्रवादी विचारसरणीचे आहेत आणि म्हणूनच लष्करात सहभागी होण्याकडे त्यांचा कल जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले.
आयएसआय तरुणींच्या सौंदर्यात अडकू नका; जवानांना आवाहन
आयएसआय तरुणींच्या सौंदर्यात अडकू नका, असे आवाहनही पर्रीकर यांनी याप्रसंगी बोलताना भारतीय जवानांना केले. वायुसेनेचे अधिकारी के. के. रंजित यांनी फेसबुकच्या माध्यमातूून दामिनी नावाच्या एका महिलेला वायुसेनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. त्या महिलेने स्वत:ची ओळख एका मासिकाची वार्ताहर म्हणून करून दिली होती. पाकिस्तानमध्ये बसून ती हे सर्व काही करीत होती. त्यानंतर रंजितला निलंबित करून अटक करण्यात आली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26552

Posted by on Jan 17 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (899 of 2453 articles)


=श्रीपाल सबनीस यांची अशीही असहिष्णुता= मंगेश पाडगावकर सभागृह (पिंपरी), [१५ जानेवारी] - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एकेरी शब्दाचा उल्लेख ...

×