Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकने केला होता अलकायदाशी सौदेबाजीचा प्रयत्न

पाकने केला होता अलकायदाशी सौदेबाजीचा प्रयत्न

Shahbaz-Sharifनवी दिल्ली, [११ मार्च] – पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने २०१० मध्ये अलकायदाबरोबर एक गुप्त करार करण्याचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक माहिती अमेरिकन सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यूयॉर्क फेडरल कोर्टात सादर केलेल्या दस्तावेजांवरून उघडकीस आली आहे. अमेरिकन सैनिकांना एबोटाबाद येथे अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या खोलीतून मिळालेल्या पत्रावरून, अलकायदा ही संघटना त्यावेळी भारताविरुद्ध आपल्या मोहिमेला अधिक गती देत होती.
विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या सर्वोच्च नेत्यांनी या संघटनेच्या म्होरक्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भारताविरुद्धचे अभियान अधिक जोमाने राबवायला सुरुवात केली होती, असे या दस्तावेजांरून स्पष्ट होते. एका इंग्रजी वर्तमान पत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तावरून हे दस्तावेज सरकारी पक्षातर्फे मूळ पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन नागरिक आबिद नासीरविरुद्ध सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सादर करण्यात आले होते. नासीरचे २०१३ मध्ये ब्रिटनमधून प्रत्यार्पण करून अमेरिकेत आणण्यात आले होते. त्याच्यावर दहशतवाद्यांचे नेतृत्व केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मँचेस्टर आणि न्यूयॉर्कमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची आबीद नासीर व त्याच्या सहकहर्‍यांची योजना होती. दस्तावेजावरून अलकायदा आणि पाकिस्तान दरम्यान २०१० च्या उन्हाळ्यात करार झाला होता. अलकायदाचा व्यवस्थापक अतिया अब्द अलरहमानने ओसामा बिन लादेनला जून २०१० मध्ये सांगितले की, हाफीजच्या कार्यकाळापासूनच पाकिस्तानचे शत्रू आमच्याशी आणि तहरीक-ए-तालिबान (हकीमुल्लाह) समवेत पत्रव्यवहार करीत आहे.
अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, हाफीज हे अल मसरीचे टोपण नाव असून तोच हकीमुल्लाह तहरीक-ए-तालिबानचा माजी प्रमुख आहे. त्याचे पूर्ण नाव हकीमुल्लाह महसूद आहे. या सार्‍या माहितीवरून पाकची आयएसआय ही संघटना अलकायदाला हाताशी धरून भारताविरुद्ध कशी कारस्थान रचत होती, ते पुरेसे स्पष्ट होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21275

Posted by on Mar 12 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1935 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [११ मार्च] - प्रतिष्ठित ‘इंटेल सायन्स टॅलेंट सर्च २०१५’ मध्ये तीन भारतीय वंशाच्या अमेरिकन युवकांनी बाजी मारली आहे. त्यांना ...

×