Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाकमधील दहशतवाद्यांना भारताची मदत!

पाकमधील दहशतवाद्यांना भारताची मदत!

  • पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या उलट्या बोंबा
  • तालिबानशी संबंध असल्याचा जावईशोध

Pakistan-defence-minister-Khuwaja-Asifइस्लामाबाद, [१३ जानेवारी] – येनकेन प्रकारे भारताला अस्थिर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या पाकिस्तानने आपल्या देशातील अतिरेक्यांना भारत पाठिंबा देत असल्याचा आरोप केला असून, भारताने हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानसाठी भारताची विशेष अशी योजना आहे आणि त्यानुसार तो देश पाकिस्तानमध्ये रक्तपात घडविणार्‍या अतिरेक्यांना पाठिंबा देत आहे, असे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी डॉन वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. पूर्व सीमेवर अशा कारवाया करून पाकचे लक्ष तिकडे गुंतवून ठेवायचे जेणेकरून पश्‍चिम सीमेवर सुरू असलेले युद्ध व देशांतर्गत दहशतवादावरून लक्ष विचलित होईल, असा भारताचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. तालिबानचे तार भारताशी जोडलेले आहेत, असा जावईशोध लावतानाच, बलुचिस्तानमधील हिंसाचारात भारताच्या सहभागाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही आसिफ म्हणाले.
भारताच्या सहभागाविषयीचे ठोस पुरावे देण्याबाबत विचारले असता ख्वाजा यांनी त्याला बगल दिली आणि सध्या कमी तीव्रतेचे युद्ध सुरू असल्याचा दावा केला. अनुभवाच्या आधारे आपण हा आरोप करत असल्याचेही ते म्हणाले. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये होणार्‍या हल्ल्यांमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अजीझ यांनी नुकताच केला होता.
‘‘दहशतवादाला कोण खतपाणी घालत आहे, याची सर्वांना कल्पना आहे. त्यामध्ये भारताचा निश्‍चितच समावेश नाही.’’
सईद अकबरुद्दिन, प्रवक्ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

Short URL: https://vrittabharati.in/?p=19682

Posted by on Jan 14 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2252 of 2458 articles)


=शिवाजी सहाणे विजयी, जयंत जाधवांची आमदारकी जाणार= नाशिक, [१३ जानेवारी] - विधान परिषदेसाठी नाशकातून तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले ...

×