Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाकमधील हल्ल्यात मनोहर पर्रीकरांचा हात

पाकमधील हल्ल्यात मनोहर पर्रीकरांचा हात

=रेहमान मलिक यांचा आरोप=
Pakistan's Interior Minister Rehman Malik speaks during an interview with Reuters in lslamabadपेशावर, [२१ जानेवारी] – पेशावरच्या बाचा खान विद्यापीठावरील हल्ल्यात भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा हात असल्याचा बिनबुडाचा आरोप पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रेहमान मलिक यांनी केला आहे. तहरिक-ए -तालिबान या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही त्यांनी भारताला यासाठी जबाबदार धरले आहे.
भारताची सहनशक्ती संपुष्टात आली असून, आपल्याला त्रास देण्यार्‍या शत्रूलाही तशाच प्रकारच्या वेदना देण्याची गरज आहे, असे वक्तव्य पर्रीकर यांनी केले होते, याची आठवण देखील मलिक यांनी करून दिली. भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ यात गुंतली आहे. रॉ या संस्थेने तहरिक ए तालिबानशी हातमिळवणी केली आहे आणि पर्रीकर यांची धमकी गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पठाणकोट हल्ल्यात जैश-ए मोहम्मदच्या सहभागाचे पुरावे मिळाल्यानंतरही पाकचा या घटनेशी संबंध नसल्याचे मलिक यांनी म्हटले होते. जैश-ए मोहम्मदचा यात काहीही संबंध नसून, भारतातील लोकच हे हल्ले घडवून आणत असल्याचा दावा त्यांनी केला होता. मोदी पाकसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना, रॉ दहशतवादी हल्ल्याच्या माध्यमातून यात अडथळे निर्माण करीत असल्याचा आणखी एक बिनबुडाचा आरोपही रेहमान मलिक यांनी केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26616

Posted by on Jan 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (886 of 2458 articles)


=राजनाथसिंह यांचे आश्‍वासन= कोलकाता, [२१ जानेवारी] - पश्‍चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ...

×