Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाकमध्ये पाय ठेवाल, तर ठार मारू!

पाकमध्ये पाय ठेवाल, तर ठार मारू!

=मुशर्रफांनी दिली होती बेनझीर यांना धमकी, अमेरिकन पत्रकाराचा दावा=
mushrraf-benazir bhuttoइस्लामाबाद, [३ ऑक्टोबर] – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो २००७ मध्ये मायदेशी परतण्याच्या तयारीत असताना, पाकचे तत्कालीन हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी भुत्तोंना ‘पाकमध्ये पाय ठेवाल, तर ठार मारू,’ अशी धमकी दिली होती. अमेरिकेतील एका पत्रकाराने या प्रकरणी दिलेल्या साक्षीत हा दावा केला आहे.
पाकच्या पंतप्रधानपदी दोनवेळा आरूढ झालेल्या बेनझीर भुट्टो यांची डिसेंबर २००७ मधील एका रॅलीत आत्मघाती हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. त्यावेळी मुशर्रफ हे पाकचे राष्ट्राध्यक्ष होते. या प्रकरणी मुशर्रफांवर आरोपी म्हणून खटला भरण्यात आला आहे. अलीकडेच या खटल्यात सुनावणी सुरू असताना अमेरिकन पत्रकार मार्क सीगल यांनी आपल्या साक्षीत सांगितले की, त्यावेळी मी मुशर्रफ यांच्या बाजूलाच बसलो होतो. माझ्या समोरच त्यांनी बेनझीर यांना फोन लावला आणि पाकमध्ये परत याल, तर जिवानिशी जाल, अशी धमकी दिली होती.
दरम्यान, मुशर्रफ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावला आहे. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्या काळात आपल्याजवळ मोबाईल फोन नव्हताच आणि मी बेनझीर भुत्तो यांना धमकीचा फोनही केला नव्हता. एप्रिल २००९ मध्ये मी मोबाईलचा वापर सुरू केला होता. बेनझीर यांच्या हत्येत मला गोवण्यासाठी माझ्याविरोधात रचण्यात आलेला हा एक कट आहे. आपल्यावरील आरोप अतिशय दुर्दैवी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24141

Posted by on Oct 4 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1388 of 2458 articles)


=जदयु मंत्र्याचा राजीनामा, भाजपात प्रवेश= पाटणा, [३ ऑक्टोबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी एकवटलेल्या महाआघाडीला ऐन विधानसभा निवडणुकीत ...

×