Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाकमध्ये विषारी दारूने २४ हिंदूंचा मृत्यू

पाकमध्ये विषारी दारूने २४ हिंदूंचा मृत्यू

pakistan-mapकराची, [२२ मार्च] – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात होळीच्या पार्श्‍वभूमीवर जल्लोष करण्यासाठी विषारी दारू पिल्याने २४ हिंदूंचा मृत्यू झाला. यात सहा महिलांचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारची घटना सिंध प्रांतात घडली होती.
एकूण ३५ जणांनी या विषारी दारूचे प्राशन केले. त्यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने लगेच या सर्वांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी २४ जणांना तपासून मृत घोषित केले, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
होळीसाठी या लोकांनी स्वस्त गावठी दारू खरेदी केली होती. उर्वरित लोकांवर उपचार करण्यात येत असून, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर संतप्त लोक रस्त्यावर आले. विषारी दारूची सर्रास विक्री होत असतानाही त्यावर आळा घालण्यासाठी पोलिस निष्क्रिय ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, प्रशासनाने या भागातील पोलिस ठाणेदाराला निलंबित केले असून, दोघांना अटक केली आहे. २०१४ मध्ये हैदराबाद आणि कराची शहरात ईदेच्या दिवशी विषारी दारू पिल्याने २९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27529

Posted by on Mar 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (591 of 2458 articles)


=अमेरिकेच्या अहवालात इशारा= वॉशिंग्टन, [२२ मार्च] - भविष्यातील संभाव्य युद्धात भारताविरोधात वापर करण्यासाठी पाकिस्तान एकीकडे अण्वस्त्र व क्षेपणास्त्रांचा साठा जमा ...

×