Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ

पाकला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ

=अजित डोभाल यांचा इशारा=
AJIT DOBHALनवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – दहशतवादाला प्रोत्साहन देणे आणि त्या माध्यमातून भारताविरोधात छुपे युद्ध पुकारणे यामुळे आपण सुरक्षित राहू, असे जर पाकिस्तानला वाटत असेल, तर ती या देशाची फार मोठी घोडचूक ठरेल. कारण, ज्या अतिरेक्यांचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर होत आहे, तेच अतिरेकी आता पाकवरही उलटले आहेत. तरीही पाक ऐकण्याच्या स्थितीत नाही. आता या देशाला त्याच्याच भाषेत समजवावे लागणार आहे, असा कडक इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दिला आहे.
पाकप्रायोजित दहशतवाद संपूर्ण दक्षिण आशियाकरिता धोकादायक ठरला आहे, असे स्पष्ट करताना, पाकने दहशतवाद्यांच्या माध्यमातून छेडलेले छुपे युद्ध तत्काळ थांबवावे. कारण, त्याचे गंभीर परिणाम आपल्यावरही होत आहेत, याची जाणीव पाकला नाही. पाककडे दूरदृष्टी असती, तर या देशाने अशा कारवायांना प्रोत्साहन दिलेच नसते, असे डोभाल यांनी सांगितले.
भारताने पाकला आतापर्यंत अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. पण, हा देश ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून आपण सुरक्षित राहू, असा पाकचा गैरसमजच झाला आहे. एक दिवस हेच दहशतवादी पाकला उद्‌ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असे सांगताना डोभाल म्हणाले की, भारत आणि दक्षिण आशियातील अन्य देशांसोबत मिळून राहिलो, तरच आपलाही आर्थिक विकास होईल आणि देशात स्थिरता येऊन नागरिकांचाही विकास होईल, ही सत्यता पाकला आजवर कधीच समजली नाही.
माझे असे स्पष्ट मत आहे की, एकतर आपण पाकला समजावण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायला हवे. पाकला जी भाषा समजेल, त्याच भाषेतून आपण या देशाला समजवायला हवे. मार्ग कोणताही असो, पाकला सरळ रस्त्यावर आणण्यात आपण यशस्वी व्हायलाच हवेे, असे डोभाल यांनी इंटरनॅशनल गुडविल सोसायटी ऑफ इंडियातर्फे आयोजित ‘दक्षिण आशियात शांततेची गरज आणि भारताची भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादात बोलताना सांगितले.
दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणामुळे दक्षिण आशियातील अनेक देशांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सध्या दक्षिण आशियाई देशांवर जे सर्वांत मोठे संकट आहे, ते दहशतवादाचे असले, तरी त्याला कोणते नाव द्यावे, हा मोठा प्रश्‍न आहे. इस्लामी दहशतवाद की जिहादी दहशतवाद? या दहशतवादामुळे भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि स्वत: पाकिस्तानही प्रभावित झाला आहे. या दहशतवादाचे केंद्र अफगाण आणि पाकच आहे. खर तरं, दक्षिण आशियातील सर्वच देशांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25396

Posted by on Oct 29 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1257 of 2453 articles)


१८९ देशांमध्ये १३० वे स्थान एकाच झटक्यात १२ देशांना मागे टाकले वॉशिंग्टन, [२८ ऑक्टोबर] - व्यवसायासाठी सर्वाधिक पोषक वातावरण ...

×