Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करा

पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करा

=भाजपाची मागणी=
SIDDHARTHA__NATH SINGH BJPअलाहाबाद, [१३ फेब्रुवारी] – लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हीड हेडलीच्या कबुलीमुळे भारतातील सर्वच दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे आणि जगभरातील अतिरेकी संघटनांना आश्रय देणाराही पाकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या देशाला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी भाजपाने आज शनिवारी केली.
पाकला दहशतवादी देश जाहीर करण्यासाठी भारताने राजनयिक पातळीवरून दबाव आणायला हवा. जगभरात दहशतवादी कारवाया करीत असलेले बहुतांश गट पाकच्या भूमीतच आश्रयात आहेत, हे हेडलीच्या कबुलीवरून सिद्ध झाले आहे. पाकचे लष्कर, गुप्तचर संस्था आयएसआय आणि या देशातील राज्यकर्तेही दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन करीत असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ नाथ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गुजरात पोलिसांनी ज्या इशरत जहॉंला आणि तिच्या चार साथीदारांना चकमकीत ठार केले, ती इशरत तोयबाचीच मानवी बॉम्ब होती, असा खुलासा हेडलीने केला आहे. इशरत जेव्हा चकमकीत ठार झाली होती, तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तिचे वर्णन बिहारची बेटी आणि एमआयएमचे नेते असाऊद्दिन ओवेसी यांनी इशरत आपली बहीण असल्याचे सांगितले होते आणि नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले होते. आता या सर्वांनी मोदी यांची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26830

Posted by on Feb 14 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (829 of 2453 articles)


=सियाचीन दुर्घटना= जम्मू, [१३ फेब्रुवारी] - सियाचीन ग्लेशियर येथे महाकाय हिमकडे कोसळल्याने त्याखाली दबून वीरमरण आलेल्या लष्करातील उर्वरित नऊ जवानांचे ...

×