Home » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » पाकला धडा शिकवण्यासाठी फौजा सज्ज

पाकला धडा शिकवण्यासाठी फौजा सज्ज

=अमित शाह यांचा विश्‍वास=
amit_shah1बंगळुरू, [३ जानेवारी] – पाकिस्तानचे सैनिक जेव्हाजेव्हा संघर्षविरामाचे उल्लंघन करून भारतीय तळांवर आणि लोकवस्त्यांवर गोळीबार करतील, त्या प्रत्येक वेळी भारतीय फौजा पाकला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहाणार नाही, असा विश्‍वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केला.
केंद्रात भाजपाच्या नेतृत्वात सक्षम सरकार आल्यानंतर पाकच्या कुरापतींना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे अधिकार लष्कर आणि सीमा सुरक्षा दलांना देण्यात आले. भारतीय फौजा आपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. आपल्या जवानांनी पाकला पांढरे निशाण हाती घेण्यास भाग पाडले. भविष्यातही भारतीय जवान अशीच प्रभावी कामगिरी पार पाडणार आहेत, असे अमित शाह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी येथे आलेले अमित शाह यांना जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्याबाबत विचारले असता, भाजपाने आपले सर्वच पर्याय खुले ठेवले असून, लवकरच राज्यातील चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
भाजपासोबत आम्ही युती किंवा सौदेबाजी करणार नाही, असे ट्विट अलीकडेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी केले होते. याकडे लक्ष वेधलेे असता, ‘उमर अब्दुल्ला सर्वकाही सांगून टाकतील, असे तुम्हाला वाटते का, मी तर कुणाला काहीच सांगणार नाही, असे उत्तर भाजपाध्यक्षांनी दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19436

Posted by on Jan 4 2015. Filed under कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य (2291 of 2452 articles)


नवी दिल्ली, [३ जानेवारी] - गरिबांची थट्टा करणारे नियोजन आयोगाची जागा घेणार्‍या ‘नीती’ आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून प्रख्यात अर्थतज्ष अरविंद पानगरिया ...

×