Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » पाकवर केवळ भारतच ठेवू शकतो ‘अंकुश’

पाकवर केवळ भारतच ठेवू शकतो ‘अंकुश’

=अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रंप यांचा विश्‍वास=
donald_trumpवॉशिंग्टन, [२६ सप्टेंबर] – दहशतवाद्यांसाठी आपली भूमी खुली करून, या कारवायांचे समर्थन करणार्‍या पाकिस्तानवर ‘अंकुश’ ठेवण्याची क्षमता केवळ भारतातच आहे, असा विश्‍वास अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अतिशय प्रबळ उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानच्या विध्वंसक कारवाया ठेचून काढण्याची आणि त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याची भारतात पुरेपूर क्षमता आहे. पाकचा जागतिक दहशतवादविरोधी लढा निव्वळ एक देखावा आहे. जगाला खर्‍या अर्थाने दहशतवादमुक्त करायचे असेल, तर भारताची साथ घेणे अमेरिकेला आवश्यक आहे. कारण, भारताचा दहशतवादविरोधी लढा प्रामाणिक आहे, असे मतही रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार असलेले ट्रंप यांनी एका रेडिओ कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.
पाकिस्तान हा जगातील सर्वांत धोकादायक देश आहे. दहशतवादाच्या माध्यमातून जगात अस्थिरता निर्माण करणे आणि दहशतवाद्यांना आपल्या भूमीत आश्रय देणे हेच पाकचे आजवरचे धोरण राहिले आहे. तिथेच, भारत हा एकमेव असा देश आहे, जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो. पाकच्या कोणत्याही कारवायांचे प्रत्युत्तर केवळ भारताकडेच आहे. पाकने अनेक घातक अण्वस्त्रे बाह्य देशांकडून खरेदी केली आहेत. या देशाची अण्वस्त्रे अतिरेक्यांच्याही हातात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशिया उपखंडात भारत जर सक्षम नसता, तर पाक अनियंत्रित झाला असता, असेही ट्रंप यांनी सांगितले.
दरम्यान, ट्रंप यांनी पाकिस्तानची तुलना उत्तर कोरियाशी केली. पाकिस्तानवर थेट हल्ला करताना ते म्हणाले की, जगभरातील दहशतवादी कारवायांना पाकचे समर्थन असल्याने, या जागतिक लढ्यात भारताला सोबत घ्यावेच लागेल. भारताकडे अण्वस्त्रांसोबतच मजबूत व शक्तिशाली सेना आहे. पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी आपल्याला भारतासोबत काम करावेच लागेल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24078

Posted by on Sep 27 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1405 of 2458 articles)


=सरकारने फाईल्स सार्वजनिक करून, तपास समिती नेमावी, अनिल शास्त्री यांची मागणी= नवी दिल्ली, [२६ सप्टेंबर] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी ...

×