किमान तापमान : 29.02° C
कमाल तापमान : 31° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.01 Mps
स्थळ : Mumbai, IN
31° C
27.81°C - 31.99°C
sky is clear27.9°C - 31.07°C
sky is clear28.34°C - 31.49°C
sky is clear28.53°C - 32.83°C
sky is clear29.1°C - 32.6°C
few clouds28.64°C - 31.99°C
sky is clearलाहोर, (१३ मार्च) – आपल्या सशक्त अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायमच चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी आपण यापुढे पाकिस्तानविरोधातील चित्रपटात काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान आणि भारतीय चित्रपटसृष्टीत परस्परांविषयी द्वेषभावना निर्माण करणार्या चित्रपटांची निर्मितीच करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘मी याआधी ‘गद्दार’ नावाच्या पाकविरोधी चित्रपटात काम केले आहे. पण, त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी भविष्यात अशा चित्रपटात काम करणार नाही. उभय देशांतील नागरिकांच्या भावना दुखाविणार्या अशा चित्रपटांवर बंदीच घातली पाहिजे,’ असेही पुरी म्हणाले. अभिनेत्री दिव्या दत्तासह सध्या पाकच्या दौर्यावर असलेले ओम पुरी लाहोर येथे माध्यमांशी बोलत होते.
Short URL : https://vrittabharati.in/?p=11898