Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » पाकव्याप्त काश्मीर अतिरेक्यांचा अड्डाच

पाकव्याप्त काश्मीर अतिरेक्यांचा अड्डाच

=पाकव्याप्त काश्मिरातील निर्वासित नेता शौकत अली काश्मिरीचा गौप्यस्फोट=
shaukat ali kashmiriजिनेव्हा, [१२ मार्च] – दहशतवादावरील पाकिस्तानचा दुतोंडी चेहरा पुन्हा एकदा जगापुढे उघड झाला आहे. भारतविरोधी अतिरेकी कारवायांना आमचे समर्थन नाही, असा दावा पाककडून वारंवार केला जात असतानाच, पाकव्याप्त काश्मिरातील निर्वासित नेता शौकत अली काश्मिरीने, पाकव्याप्त काश्मीर म्हणजे भारतविरोधी कारवाया करणार्‍या अतिरेक्यांचे लॉन्चिंग पॅड असून, या प्रदेशात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह अनेक संघटनांचे अतिरेकी निर्भयपणे फिरत असतात, असा गौप्यस्फोट करून पाकला तोंडघशी पाडले आहे.
भारतविरोधी कारवायासाठी सीमेवर अतिरेक्यांची जी काही घुसखोरी होत असते, ती पाकव्याप्त काश्मिरातूनच होते. पाकव्याप्त काश्मिरात अनेक संघटनांचे अतिरेकी आहेत. त्यांच्या हालचालींवर कुठलेही निर्बंध नाही. त्यांना सरकार, लष्कर आणि आयएसआयचे समर्थन आहे. पाकिस्तानमधील राज्यकर्ते एकीकडे दहशतवादविरोधी लढ्याच्या गप्पा करतात, पण याच देशाने पाकव्याप्त काश्मीरला अतिरेक्यांचे लॉन्चिंग पॅड बनविले आहे. भारतविरोधी सर्व कारवाया याच भागातून सुरू असतात. पाकच्या बोलण्यात आणि कृतीत बरेच अंतर आहे, असे काश्मिरीने जिनेव्हा येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीचा वापर भारतविरोधी अतिरेकी कारवायांसाठीच होत असल्याने आणि या प्रदेशात अतिरेक्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असल्याने स्थानिक नागरिकांच्या मनात पाकमधील राज्यकर्त्यांविषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे. वाढत्या अतिरेकी कारवायांमुळे येथे प्रचंड गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. अतिरेक्यांना शस्त्र व आत्मघाती हल्ल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठीही या भागात मोठ्या प्रमाणात शिबिरे तयार करण्यात आली आहेत. सरकार आणि लष्कराचे त्यांना पूर्ण समर्थन असल्याने ते कुठेही ये-जा करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27266

Posted by on Mar 13 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (681 of 2458 articles)


=पंतप्रधानांची ग्वाही= नवी दिल्ली, [१२ मार्च] - भारत हा देश स्थिर सूक्ष्म अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे. या देशात आर्थिक सुधारणा आणि ...

×