Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पाकसमर्थनार्थ घोषणा देणार्‍यांची जागा तुरुंगातच

पाकसमर्थनार्थ घोषणा देणार्‍यांची जागा तुरुंगातच

=राजनाथसिंह यांचा इशारा, निष्पाप लोकांना त्रास होणार नाही=
RAJNATH SINGHनवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटनेवरून राजकारण सुरू झाले असताना आणि सध्याची स्थिती आणिबाणीपेक्षाही भीषण असल्याची टीका डाव्यांकडून होत असताना, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी, ‘निष्पाप विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि जे दोषी आहेत, त्यांची गय केली जाणार नाही,’ असा कडक इशारा दिला. सोबतच, पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍यांची जागा केवळ तुरुंगातच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निष्पाप विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे राजनाथसिंह यांनी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेला अतिरेकी अफझल गुरूच्या समर्थनार्थ बुधवारी या विद्यापीठात काही विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी शुक्रवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करीत, विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारला अटक केली होती. त्याला सोडण्याच्या मागणीसाठी डावे आणि जदयु नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी राजनाथसिंह यांची भेट घेतली होती. याच अनुषंगाने राजनाथसिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
भारतात राहून भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्याचे प्रकार देशविरोधी कृत्यांसारखेच आहेत. आम्ही ते कदापि मान्य करणार नाही. पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍यांना कारागृहातच जावे लागेल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. यात जे कुणी सहभागी आहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यात कोणत्याही निष्पाप विद्यार्थ्याला त्रास होणार नाही, याची परिपूर्ण काळजीही घेतली जाईल, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26835

Posted by on Feb 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (827 of 2453 articles)


=जेटलींचा मनमोहनसिंगांवर पलटवार= नवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] - नरेंद्र मोदी सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कळीत झाली, अशी टीका करणारे ...

×