Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकसोबत नेहमीच सतर्क राहायला हवे

पाकसोबत नेहमीच सतर्क राहायला हवे

=पंतप्रधानांचे प्रतिपादन=
narendra-modi-513नवी दिल्ली, [२७ जून] – भारताने आतापर्यंत पाकसोबत अनेकदा जोखीमपूर्ण पुढाकार घेतला आहे. पण, आता मला असे वाटते की, भारताने नेहमीच सतर्क राहायला हवे. सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची आमची इच्छा आहे. पण, चर्चा नेमकी कुणासोबत करायची, पाक सरकारसोबत की त्या देशाच्या आश्रयात असलेल्या अतिरेक्यांसोबत? अशी रोखठोक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी मांडली.
अलीकडील काळात मला जो अनुभव आला, त्यावरून मला हा प्रश्‍न नेहमीच पडत आहे. पाकमध्ये लक्ष्मण रेषा आखण्याबाबत निर्णय कुणी घ्यायचा? ही रेषा पाक सरकार तयार करणार आहे की, तेथील अतिरेकी गट? या प्रश्‍नाचे उत्तर सध्या तरी नाही. त्यामुळे पाकबाबत आपण नेहमीच सतर्क आणि जागरूक असायला हवे. कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा घातक ठरू शकतो, असे पंतप्रधानांनी एका मुलाखतीत सांगितले.
पाकसोबत द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी लक्ष्मण रेषा काय असायला हवी. कारण, कारण, २०१४ मध्ये द्विपक्षीय चर्चेत हुर्रियत राहणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती आणि नंतर पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा रद्द झाली होती, असा प्रश्‍न पंतप्रधानांना विचारण्यात आला होता. आज संपूर्ण जगानेच दहशतवादावरील भारताची भूमिका मान्य केली आहे. भारताच्या भूमिकेचे समर्थन केले जात आहे आणि पाकला या मुद्यावर उत्तर देणे कठीण जात आहे. संपूर्ण जग पाकच्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28982

Posted by on Jun 28 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (167 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२७ जून] - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला पाच दिवसांचा चीनचा दौरा एक दिवसाने कमी करून आज ...

×