Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

=सिप्रीचा अहवाल=
SIPRI-logoलंडन, [१३ जून] – पाच मिनिटांत भारतावर अणुहल्ला करण्यास पाकिस्तान सक्षम आहे, असा दावा अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांनी केला असतानाच, पाकिस्तानपेक्षा भारताकडे जास्त अण्वस्त्रे असल्याचा अहवाल स्टॉकहोमस्थित एका थिंक टँकने सोमवारी दिला.
अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तानने उत्तर कोरिया आणि इस्रायललाही मागे टाकल्याचे या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानने किती धमक्या दिल्या तरी भारत त्या देशाला बेचिराख करण्यास सक्षम आहे, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते, हे विशेष.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात सिप्री या थिंक टँकने दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानकडे सध्या ११० ते १३० अण्वस्त्रे आहेत. याउलट भारताकडे १०० ते १२० अण्वस्त्रे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अमेरिका आणि रशिया हे अण्वस्त्रांच्या बाबतीत आघाडीवर असलेले देश अण्वस्त्रे कमी करत असले तरी आपल्या क्षमतेचे आधुनिकीकरण करत आहेत, असे सिप्रीच्या अहवालात म्हटले आहे.
अण्वस्त्रसंपन्न असलेल्या इतर देशांकडे संख्या कमी असली तरी यापैकी अनेक देशांनी नवी अण्वस्त्र डिलिव्हरी यंत्रणा बसविणे सुरू केले आहे किंवा तसा आपला विचार असल्याची घोषणा केली आहे. चीन आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करून क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रांचा साठा वाढविण्यासह मिसाईल डिलिव्हरी क्षमताही वाढवत आहेत. उत्तर कोरियाकडे १० अण्वस्त्रे तयार होतील इतका साठा आहे. परंतु, उत्तर कोरियाने अण्वस्त्र तयार केले किंवा ते तैनात केल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही, असे या थिंक टँकच्या अहवालात म्हटले आहे.
अण्वस्त्रांच्या संख्येबाबत गेल्या वर्षीही पाकिस्तान भारताच्या पुढेच होता. गेल्यावर्षी भारताकडे ९० ते ११० आणि पाकिस्तानकडे १०० ते १२० अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात आले होते. २०१६ च्या सुरुवातीला अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या नऊ देशांकडे एकूण ४,१२० तैनात असलेली अण्वस्त्रे आहेत. जर सर्व अण्वस्त्रांची मोजणी करायची झाल्यास या सर्व देशांकडे २०१५ च्या सुरुवातीला असलेल्या १५,८५० तुलनेत १५,३९५ अण्वस्त्रे आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28575

Posted by on Jun 13 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (247 of 2458 articles)


=लालूप्रसाद यादव यांची टीका= रांची, [१३ जून] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर दोन-तीन महिन्यांनंतर होणार्‍या विदेश दौर्‍यावरून त्यांच्यावर विरोधक ...

×