Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकिस्तान, चीनचा जळफळाट

पाकिस्तान, चीनचा जळफळाट

Michelle Obama, Pranab Mukherjee, Barack Obama and PM Narendra Modi at the reception hosted by President Pranab Mukherjee.नवी दिल्ली, [२७ जानेवारी] – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, भारताचा पारंपरिक शत्रू राहिलेल्या पाकिस्तान आणि चीनचा मात्र ओबामांच्या भारत दौर्‍यामुळे चांगलाच जळफळाट झालेला दिसून येत आहे. बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री निव्वळ देखावा असल्याची टीका या दोन्ही देशांनी केली आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचे रविवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी भारतात आगमन झाले. त्यांच्या या ऐतिहासिक दौर्‍याकडे संपूर्ण जगाचेच लक्ष लागले होते. या दौर्‍यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिकच मजबूत झाल्यामुळे पाक आणि चीनचा जळफळाट झाला. बराक ओबामा चीनच्या विरोधात भारताचा वापर करीत आहेत, असे चीनमधील राजकीय तज्ज्ञ आणि वृत्तपत्रांचे मत आहे. एकमेकांचे शेजारी असलेल्या भारत आणि चीनने पाश्‍चिमात्य देशांच्या जाळ्यात अडकू नये, असा इशारा चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’मधील एका लेखातून देण्यात आला आहे.
‘‘राजधानी दिल्लीत आगमन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ओबामांचे स्वागत अलिंगन देऊन केले होते. हा प्रकार नवीन नसला, तरीही भारतातील प्रसारमाध्यमे या भेटीला रंगवून दाखवत आहेत. चांगले संबंध असलेल्या देशांमध्ये वैरभाव निर्माण करण्याचे पाश्‍चिमात्य देशांचे नेहमीच प्रयत्न असतात. चीन आणि भारत यांच्यात वाद व्हावे, हाच ओबामा यांच्या भारत भेटीमागचा मुख्य उद्देश आहे,’’ असे या दैनिकाने म्हटले आहे. शिनुआ या शासकीय वृत्तसंस्थेनेही ओबामांच्या भारत दौर्‍यावर टीकात्मक भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक मुद्यांवर तीव्र मतभेद असतानाही ओबामा मोदींसोबत मैत्रीचा देखावा करीत आहेत, असे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
पाकमधील वृत्तपत्रांनीही ओबामा यांच्या भारत भेटीवर टीकास्त्र सोडले आहे. पाकची नकारात्मक प्रतिमा दाखविण्यासाठीच भारताने ओबामांना मुद्दाम प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते, असे पाकी वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. ‘डॉन’ या वृत्तपत्राने तर भारतीय प्रसार माध्यमांना चक्क ‘राष्ट्रवादी मीडिया’ असे संबोधले आहे. ओबामा यांच्या भारत दौर्‍यामुळे पाकिस्तान स्वत:ला गेल्या काही दिवसांपासून असुरक्षित समजत असल्याचे वृत्त ‘द नॅशन’ने दिले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20106

Posted by on Jan 28 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2162 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीचे पोशाख परिधान करतात, ते अफलातून असेच असतात. त्यांच्या वेशभूषेवर तसेही ...

×