Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाक, बांगलादेशातील मुस्लिम मूळचे हिंदूच!

पाक, बांगलादेशातील मुस्लिम मूळचे हिंदूच!

  • पाकिस्तानच्या महिला अभ्यासक फौजिया सईद यांचा दावा
  • जिवाच्या भीतीने स्वीकारला होता इस्लाम धर्म

fouzia-saeed-PAKनवी दिल्ली, [५ ऑक्टोबर] – पाकिस्तान आणि बांगलादेशात राहत असलेले बहुतांश मुस्लिम हे मुळात हिंदूच आहेत. अतिशय कमी लोक, जे हिंदू नाहीत, ते बौद्ध आहेत, असा दावा पाकिस्तानच्या महिला अभ्यासक फौजिया सईद यांनी केला आहे.
पाक आणि बांगलादेशातील मुस्लिमांना कदाचित ही सत्यता स्वीकारणे सहज शक्य होणार नाही. कदाचित, हे कटू सत्य मानण्यास ते तयार होणार नाहीत. पण, सत्यता अशीच आहे की, या दोन्ही देशांमध्ये राहाणार्‍या मुस्लिमांचे पूर्वज हिंदूच होते आणि मोघलांच्या काळात तलवारीच्या धाकावर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते, असे फौजिया यांनी ‘इंडिया टूमॉरो डॉट कॉम’ या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत पाकिस्तानी मौलवी झईद हमीद यांनी विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
पाकिस्तानमधील बहुतांश मुस्लिम स्वत:ला आशिया उपखंडात आक्रमण करणार्‍या आणि अनेक वर्षे राज्य करणार्‍या अरबांचे वंशज समजतात. पण, त्यात सत्यता नाही. वास्तविक, पाक आणि भारतात जे मुस्लिम आहेत, त्यांचे पूर्वज जन्माने हिंदू होते आणि सुफी संतांनी त्यांना मृत्यूची भीती दाखवून इस्लाम बनविले होते, असेही त्यांनी सांगितले.
पाकमधील ९९ टक्के मुस्लिम हे हिंदूच आहेत. पण, दुर्दैवाने पाकिस्तानी नागरिक हे कटू सत्य मानण्यास तयार नाही. आपण हिंदू आहोत, हे ऐकण्याचीही त्यांची तयारी नाही. उपखंडात आक्रमण करणार्‍या अरब आणि तुर्की शासकांनी ज्या हिंदूंनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला, त्यांची हत्या केली. तर, अनेकांनी केवळ जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने इस्लाम धर्माचा स्वीकार केला, असेही त्या म्हणाल्या.
चीमा, बाजवा, घाखर, सेठी आणि सेहगल यासारखे आडनाव हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांमध्ये पाहायला मिळते, हा युक्तिवादही त्यांनी अमान्य केला. मूळात हे आडनाव हिंदूंचेच आहेत आणि ज्यांनी भीतीपोटी इस्लाम धर्म स्वीकारला, त्यांनी पुढे हेच आडनाव कायम ठेवल्याने ते आता इस्लाम धर्मातही पाहायला मिळत आहे, असा दावाही त्यांनी केला
पाक दहशतवादी राष्ट्रच
पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र संबोधण्यात काहीच गैर नाही. कारण, हा देश गेल्या कित्येक वर्षांपासून दहशतवाद्यांना आपल्या भूमीत आश्रय देत आहे. अल् कायदाचा म्होरक्या आपल्याच भूमीत आहे, याची माहिती पाकमधील राज्यकर्त्यांनाही होती. अमेरिकेने त्याला पाकच्या भूमीत घुसून ठार मारले. आणखी काही अतिरेकी नेते या देशात मोकाट फिरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24172

Posted by on Oct 6 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1380 of 2458 articles)


=जागतिक बँकेचा ताजा अहवाल= वॉशिंग्टन, [५ ऑक्टोबर] - भारतात २०१२ मध्ये इतर गरीब देशांच्या तुलनेत गरिबांची संख्या सर्वाधिक होती. पण, ...

×