Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाक लष्कराचे कराचीकडे कूच

पाक लष्कराचे कराचीकडे कूच

=राज्यकर्त्यांविरुद्ध उठावाची शक्यता=
Pakistan_Map1इस्लामाबाद, [२७ एप्रिल] – परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ सरकारविरुद्ध केलेल्या लष्करी उठावाचे दुष्परिणाम पाकिस्तान अजूनही भोगत असतानाच पाकी लष्कराच्या एका तुकडीने आज सोमवारी कराची शहराकडे कूच केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कराची शहरातून राज्यकर्त्यांना हुसकावून शहर ताब्यात घेण्याची लष्कराची योजना असल्याचे कळते.
कराची शहरावर अनेक वर्षांपासून मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे वर्चस्व आहे. आयएसआय या गुप्तचर संस्थेचे प्रमुख रिझवान अख्तर यांच्या मते, कराची शहरात कुठलाही हिंसाचार होऊ न देता सत्ताधार्‍यांविरुद्ध लष्करी उठाव करण्यासाठी पाकी सेना सज्ज झाली आहे.
कराची हे पाकमधील सर्वात मोठे शहर आहे. व्यवसाय आणि नैसर्गिक संसाधनेही येथे मोठ्या प्रमाणात आहेत. संपूर्ण पाकिस्तानचे जितके वार्षिक उत्पन्न आहे, त्यातील अर्धा वाटा या शहराचा आहे. शेअर बाजार, मध्यवर्ती बँक आणि देशातील सर्वात मोठे बंदरही येथेच आहे. पण, राज्यकर्त्यांनी या शहराची वारंवार लूट केली आहे. यापुढे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला या शहरावर सत्ता करण्याची संधी आम्ही देणार नाही, असे आयएसआय आणि लष्कराशी संबंधित एका वरिष्ठ अधिकार्‍याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
तसे पाहिले तर, २०१३ मध्येच कराचीचा ताबा घेण्यासाठी लष्कराची मोहीम सुरू झाली होती. पण, गेल्या महिन्यात या मोहिमेला आणखी गती मिळाली होती. निष्पाप नागरिकांची हत्या करणारे गुन्हेगार आणि अतिरेक्यांना ठार मारण्यासाठीच लष्कराची ही तुकडी कराचीकडे रवाना झाली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्युएम) वरिष्ठ नेते लष्कराचे लक्ष्य असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.
या शहराला एमक्युएमच्या नियंत्रणातून मुक्त करणे आणि इतर राजकीय पक्षांना वाव मिळेल, असे वातावरण तयार करणे, हादेखील लष्कराचा या उठावामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. तथापि, लष्करातील कोणत्याही अधिकृत व्यक्तीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22340

Posted by on Apr 28 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1746 of 2458 articles)


=लेखी परीक्षेत किमान २० गुण आवश्यक, राज्य शिक्षण मंडळाचा प्रस्ताव= कोल्हापूर, [२७ एप्रिल] - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आगामी शैक्षणिक ...

×