Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

  • पुद्दुचेरी, तामिळनाडूत १६ मे रोजी मतदान
  • आसामात दोन, तर बंगालमध्ये ६ टप्प्यांत मतदान
  • १९ मेला लागणार निकाल

Syed Nasim Ahmad Zaidi (EC)नवी दिल्ली, [४ मार्च] – निवडणूक आयोगाने आज शुक्रवारी आसाम, केरळ, पश्‍चिम बंगाल , तामीळनाडू आणि पुडुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभेच्या ८२४ जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात म्हणजे १६ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. आसामात ४ व ११ एप्रिल, अशा दोन टप्प्यांमध्ये, तर पश्‍चिम बंगालमध्ये ४ एप्रिल ते ५ मे दरम्यान सर्वाधिक म्हणजे ६ टप्प्यांत मतदान होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत या पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केली. आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमांची घोषणा करताच या सर्व राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल १९ मे रोजी लागणार आहे. २१ मेपर्यंत या राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या पाचही राज्यांतील निवडणूक शांततापूर्ण व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे झैदी यांनी सांगितले.
पश्‍चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान ४ आणि ११ एप्रिल अशा दोन भागात होणार आहे. नंतर १७, २१, २५, ३० एप्रिल आणि ५ मे अशा सहा टप्प्यांत बंगालमध्ये मतदान होणार आहे.
केरळ विधानसभेच्या १४० जागांसाठी एकाच टप्प्यात म्हणजे १६ मे रोजी मतदान होणार आहे. या राज्यात २२ एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. त्याच दिवशीपासून उमेदवारी अर्जही भरता येतील. २९ एप्रिल अर्ज भरण्याची अंतिम तिथी आहे. ३० मे रोजी अर्जांची छाननी होईल. २ मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील आणि १६ मे रोजी राज्यात मतदान होईल.
तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठीही एकाच टप्प्यात म्हणजे १६ मे रोजी मतदान होईल. २२ एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाईल. त्यानंतर लगेचच उमेदवारी अर्ज भरता येतील. २९ एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ३० एप्रिलला अर्जांची छाननी होईल. २ मे पर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि १६ मे रोजी मतदान होईल.
पुद्दुचेरी विधानसभेच्या ३० जागांसाठी १६ मे रोजीज मतदान होणार आहे. अधिसूचना २२ एप्रिलला जारी होणार असून, २९ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील. ३० एप्रिलला अर्जाची छाननी केली जाईल. २ मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून १६ मे रोजी मतदान होईल.
आसाम विधानसभेसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६५ जागांसाठी ४ एप्रिलला, तर दुसर्‍या टप्प्यातील ६१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ११ मार्चला अधिसूचना निघणार असून १८ मार्चपर्यंत अर्ज भरता येतील. १९ मार्चला अर्जाची छाननी होईल. २१ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून ४ एप्रिलला मतदान होईल. दुसर्‍या टप्प्यातील ६१ जागांसाठी १४ मार्चला अधिसूचना निघणार असून, २१ मार्चपर्यंत अर्ज भरता येतील. २२ मार्चला अर्जांची छाननी होणार असून, २६ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ११ एप्रिलला मतदान पार पडेल.
पश्‍चिम बंगाल विधानसभेसाठी ६ टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ४ आणि ११ एप्रिल, अशा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ११ आणि १४ मार्चला अधिसूचना निघणार आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी २२ मार्च, तिसर्‍या टप्प्यासाठी २८ मार्च, चौथ्या टप्प्यासाठी १ एप्रिल, पाचव्या टप्प्यासाठी ४ एप्रिल आणि सहाव्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला अधिसूचना निघणार आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी १७ एप्रिल, तिसर्‍या टप्प्यासाठी २१ एप्रिल, चौथ्या टप्प्यासाठी २५ एप्रिल, पाचव्या टप्प्यासाठी ३० एप्रिल आणि सहाव्या टप्प्यात ५ मे रोजी मतदान होणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत १७ कोटींपेक्षा अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे झैदी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27023

Posted by on Mar 5 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (767 of 2453 articles)


नवी दिल्ली, [४ मार्च] - ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना यावर्षीचा दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला. ७८ वर्षीय ...

×