Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी

election countingनवी दिल्ली, [१८ मे] – पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवारी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी १२ पर्यंत पाचही राज्यांमधील सत्तेचा कल स्पष्ट झालेला असेल.
अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पाचही राज्यांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्समधील मतमोजणी सुरू होण्याआधी टपालाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या मतांची गणती करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अर्ध्या तासातच पूर्ण होईल, असे हा अधिकारी म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28318

Posted by on May 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (322 of 2453 articles)


=ऋषी कपूर यांचा कॉंगे्रसवर हल्ला= मुंबई, [१८ मे] - देशावर सुमारे ६० वर्षे राज्य करताना देशभरातील महत्त्वाची ठिकाणे आणि राष्ट्रीय ...

×