Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पाच वर्षात २० राज्यात सत्ता

पाच वर्षात २० राज्यात सत्ता

=जावडेकर यांचा विश्‍वास=
prakash javedkarजयपूर, [१७ जानेवारी] – देशात भाजपाचा विस्तार सातत्याने होतच राहाणार आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत देशातील किमान २० राज्यांमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झालेले असेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केला.
लोकांचा भाजपावर विश्‍वास बसला आहे. प्रत्येक राज्यात लोक भाजपालाच विजयी करीत आहेत. आगामी पाच वर्षांच्या काळात किमान २० राज्यांमध्ये केवळ भाजपाचाच मुख्यमंत्री असेल, असे जावडेकर यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपा चांगली कामगिरी करणार आहे. येथे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि राजधानी दिल्लीतील नागरिकांना स्थिर व सक्षम सरकार देऊ. किरण बेदी यांच्या भाजपा प्रवेशाचे दिल्लीकरांनी स्वागत केले आहे. अन्य राज्यांमध्येही स्वच्छ प्रतिमेचे लोक भाजपात प्रवेश करीत आहेत, असे त्यांनी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
किरण बेदी याच दिल्लीतील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील का, असे विचारले असता, याबाबतचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीतच घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19797

Posted by on Jan 18 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2214 of 2453 articles)


=प्रवीण तोगडिया यांची स्पष्ट भूमिका= मंगळुरू, [१७ जानेवारी] - देशात बळजबरीच्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा केंद्र सरकार तयार करीत नाही ...

×