Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » पाच विदेशी उपग्रह अवकाशात झेपावले

पाच विदेशी उपग्रह अवकाशात झेपावले

  • इस्रोची ऐतिहासिक कामगिरी
  • आतापर्यंत ४५ विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण
  • वैज्ञानिकांनी केला जल्लोष

pslv-isroचेन्नई, [१० जुलै] – ब्रिटनचे पाच उपग्रह एकाचवेळी अंतराळात पाठविण्याची आजवरची सर्वात अवजड कामगिरी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज शुक्रवारी रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी पार पाडली. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून ‘पीएसएलव्ही सी-२८’ यानाच्या माध्यमातून हे पाचही उपग्रह अंतराळात झेपावले आणि तेथे उपस्थित वैज्ञानिकांनी एकच जल्लोष केला.
येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात या मोहिमेची तयारी करण्यात आली होती. बुधवारी याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले होते.
आज अंतराळात पाठविलेल्या पाचही उपग्रहांचे एकूण वजन १४४० किलोगॅ्रम इतके आहे. इस्रो आणि ऍन्ट्रिक्सतर्फे आजवरच्या इतिहासात इतके जड उपग्रह आकाशात पाठविण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे, असे इस्रोने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे.
‘पीएसएलव्ही सी-२८’ या यानाची ही १३ वी कामगिरी होती. यातील तीन उपग्रह अंतराळातून पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी आहेत. ‘डीएमसी-३’ असे या उपग्रहांचे नाव असून, ते सर्व्हे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि ब्रिटनने संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित केले आहेत. यातील प्रत्येक उपग्रहाचे वजन ४४७ किलो आहे. पीएसएलव्ही-एक्सएलच्या मदतीने या उपग्रहांना सूर्याच्या ६४७ किमीच्या समकालिक कक्षेत पाठविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त पीएसएलव्हीच्या माध्यमातून ब्रिटनचा ‘सीबीएनटी-१’ हा अर्थ ऑब्झव्हेटर अर्थ सॅटेलाईट आणि ‘डी-आर्बिटसेल’ हा नॅनो सॅटेलाईटही अंतराळात पाठविण्यात येणार आहे, असे इस्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले. विशेष म्हणजे १९९९ पासून आतापर्यंत भारताने विविध देशांचे ४० उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. आजचे ब्रिटनचे पाच उपग्रह धरून ही संख्या आता ४५ झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23368

Posted by on Jul 11 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1567 of 2453 articles)


=आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा विश्‍वास= वॉशिंग्टन, [१० जुलै] - आर्थिक विकासाच्या स्पर्धेत भारत याचवर्षी चीनला पछाडणार असल्याचा विश्‍वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला ...

×