Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पाणी वाचवा, विविध पिके घ्या

पाणी वाचवा, विविध पिके घ्या

=पंतप्रधानांचा शेतकर्‍यांना मंत्र, डेअरी, पोल्ट्रीवर भर देण्याचाही सल्ला=
Narendra Modi12नवी दिल्ली, [१९ मार्च] – सलग दोन वर्षे मान्सूनचा कमी पाऊस आणि गारपिटीसह सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या देशातील शेतकर्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी पाणी वाचविण्याचा आणि वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्याचा मंत्र दिला. तसेच, दुष्काळातही आपले उत्पन्न सुनिश्‍चित करण्यासाठी शेतीसोबतच डेअरी, पोल्ट्री आणि अन्न प्रक्रिया यासारखी कामेही हाती घेण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
राजधानी दिल्लीत तीन दिवसीय ‘कृषी उन्नती मेळ्या’चे उद्‌घाटन करताना पंतप्रधान म्हणाले की, मे २०१४ मध्ये माझे सरकार सत्तेवर आले तेव्हापासून शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविता यावे, यासाठी नवीन पीक विमा योजना आणि मृदा आरोग्य कार्ड देण्यासोबतच कृषीच्या विकासासाठी ठोस पुढाकार घेण्यात आला आहे.
पूर्वोत्तर राज्यांमध्ये दुसरी हरित क्रांती आणण्याच्या आवश्यकतेवर भर देताना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्लाही पंतप्रधानांनी शेतकर्‍यांना दिला. कृषीचे उत्पादन आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जल संवर्धन हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सरकारने ९० सिंचन प्रकल्पांची निवड केली आहे. यातून ८० लाख हेक्टर्स जमिनीला भरपूर पाणी मिळू शकणार आहे. देशातील सिंचन प्रकल्पांकरिता सरकार २० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
सरकार जे प्रकल्प राबवित आहे, ते सर्व आमच्याच काळातील आहेत, असा दावा करणार्‍या विरोधकांना आडव्या हाताने घेताना पंतप्रधान म्हणाले की, तुम्हाला ऐकूण आश्‍चर्य वाटेल की, पाण्याने ओतप्रोत भरलेले ९० प्रकल्प बांधण्यात आले होते. पण, त्यातील पाणी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कुठलीही योजना पूर्वीच्या सरकारकडे नव्हती. माझे सरकार आता याच प्रकल्पांतील पाणी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवत आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशातील ८० लाख हेक्टर्स इतकी जमीन सिंचनाखाली येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27481

Posted by on Mar 20 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (604 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१९ मार्च] - पीपीएफ आणि किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर मिळणार्‍या उत्पन्नाच्या व्याजदरात कपात करण्याच्या आपल्या निर्णयावर नरेंद्र मोदी ...

×