किमान तापमान : 26.61° C
कमाल तापमान : 27.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.75 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
26.85°C - 29.52°C
scattered clouds26.18°C - 29.3°C
sky is clear26.09°C - 28.8°C
scattered clouds25.37°C - 28.32°C
sky is clear25.23°C - 28.74°C
sky is clear25.53°C - 29.71°C
few clouds=पाच संशयितांना अटक=
कोल्हापूर, [१७ फेब्रुवारी] – भाकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी दिली. सोमवारी सकाळी हे दाम्पत्य मोकळ्या हवेत फिरून घरी परतत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.
पथकराविरोधात व्यापक मोहीम राबविणारे प्रख्यात कामगार नेते गोविंद पानसरे यांची प्रकृती अजूनही धोक्याबाहेर नसली, तरी ती स्थिर आहे, अशी माहिती येथील खाजगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास दामले यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
नऊ डॉक्टरांच्या पथकाने गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी दिवसभरात तीन शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या शरीरातील सर्व गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यांचा रक्तस्रावही आता नियंत्रणात आला आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तब्बल आठ तासपर्यंत चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर म्हणाले. त्यांच्या फुप्फुसाची हानी झाली असल्याने त्यांना आम्ही कृत्रिम श्वसनप्रणालीवर ठेवले आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाबही स्थिर असून, किडनीचे कार्यही सुरळीत आहे, असे दामले यांनी सांगितले.