Home » ठळक बातम्या, मराठवाडा » पालिकेचे पाणी चोरून मिनरल वॉटरचा धंदा

पालिकेचे पाणी चोरून मिनरल वॉटरचा धंदा

=दुष्काळी भागात पाणी माफियांचा असाही ‘उद्योग’=
water-2नांदेड, [१६ एप्रिल] – मराठवाड्यातली जनता पाण्यासाठी अक्षरशः कासावीस झालेली आहे. या भीषण परिस्थितीत नांदेडमधले पाणी माफिया मात्र स्वतःचं उखळ पांढरं करुन घेण्यात मग्न आहेत. या मस्तवाल पाणी माफियांनी थेट नांदेड पालिकेच्या पाण्यावरच डल्ला मारला आहे. त्यांनी चक्क मिनरल वॉटरचा धंदा सुरू केल्याची माहिती आहे. पाणी माफिया मात्र थेट पालिकेच्याच पाण्यावर डल्ला मारत आहे. या पाण्यावर लाखो रुपये कमवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पाणी चोरी करुन लाखो रुपये कमावत असल्याचा प्रकार नांदेड मध्ये उघडकीस आला आहे.
नांदेड महापालिकेचे आयुक्त सुशील खोडवेकर यांनी स्वत: अशा कारखान्यांवर धाडी टाकून कारवाई केली. महापालिकेच्या मुख्य पाईपलाईनमध्ये छोट्या पाईपद्वारे, हे पाणी माफिया पाणीचोरी करत होते. चोरलेल्या पाण्यातून मिनरल वॉटर बनवण्याचा धंदा शहरात अनेक ठिकाणी सुरु होता. ही माहिती मिळताच पालिका आयुक्त सुशील खोडवेकर यांनी नांदेड शहरातील एकूण चार मिनरल वॉटर कारखान्यांवर धाडी टाकल्या.
पालिकेच्या मुख्य पाईपलानमधून पाणी चोरून वॉटर फिल्टर प्लांट चालवले जात असल्याचे उघडकीस आले. यापैकी कुठल्याही प्लांटने महापालिकेची परवानगीही घेतली नसल्याचे उघड झाले आहे. या सर्व वॉटरप्लांटला सील ठोकण्यात आले आहे. बोअर मारून या प्लांटमध्ये त्यावर प्रक्रिया करुण पाणी फिल्टर करुन विकल्या जाते. पण आता जमिनितील पाणीपातळी खाली गेल्याने सर्व बोअरींगला पाणी येत नाही. त्यामुळे चोरीची शक्कल माफियांनी लढवली.
दुष्काळात पलिकेच्या पाईपलाईनमधून पाणी चोरी करण्यात आलेल्या पाण्यावर माफिया कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. शिवाय एक लिटर शुद्ध पाणी तयार करण्यासाठी दीड लीटर पाणी हे वाया घालवत असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, आयुक्तांनी कडक पावले उचलत कारवाई केली. ही कारवाई तीन दिवस सुरूच राहणार आहे. सर्व अनधिकृत वॉटर प्लांटवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त सुशील खोडवेकर दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27833

Posted by on Apr 17 2016. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (487 of 2454 articles)


=राजनाथसिंह यांचा रोखठोक इशारा= रायपूर, [१६ एप्रिल] - पाकिस्तान या शेजारी देशासोबतचे संबंध सुधारण्याचा भारताने सातत्याने प्रयत्न केला, असे केंद्रीय ...

×