Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पासपोर्ट आता हिंदीतही

पासपोर्ट आता हिंदीतही

नवी दिल्ली, २३ जून – पासपोर्टमध्ये आता इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना हिंदी भाषेतूनही पासपोर्ट प्रात करता येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज शुक्रवारी ही घोषणा केली.
यापूर्वी पासपोर्टमधील माहिती इंग्रजीमधूनच भरणे अनिवार्य होते. आता मात्र पासपोर्ट हिंदी भाषेतूनही मिळणार आहे. तसेच पासपोर्टसाठी असलेला अर्जही हिंदी भाषेतून भरता येणे शक्य होणार आहे.
पासपोर्ट कायद्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना स्वराज यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला. या महत्त्वाच्या घोषणेसोबतच, त्यांनी आठ वर्षांखालील आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी पासपोर्टच्या शुल्कात १० टक्के कपात करण्याचाही निर्णय घेतला. तथापि, हे दोन गट सोडून इतरांना सध्या असलेले शुल्कच भरावे लागणार आहे. या कार्यक्रमात सुषमा स्वराज यांनी स्मारक स्टॅम्पचेदेखील विमोचन केले आहे. (वृत्तसंस्था)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34787

Posted by on Jun 24 2017. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (55 of 2453 articles)


=अफगाण सीमेवर वापर: मनोहर पर्रीकर यांचा इशारा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ मार्च – अफगाणिस्तानच्या सीमेवर रासायनिक शस्त्रांचा वापर होत आहे, ...

×