Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पिल्लईंच्या गौप्यस्फोटाने कॉंग्रेसमध्ये भूकंप

पिल्लईंच्या गौप्यस्फोटाने कॉंग्रेसमध्ये भूकंप

=भूमिका स्पष्ट करा : भाजपा=
g-k-pillai_ex union home secretaryनवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] – गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहॉं आणि तिचे अन्य चार साथीदार लष्कर-ए-तोयबाचेच अतिरेकी होते, अशा आशयाच्या शपथपत्रात तत्कालीन कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनीच आपल्या सोयीनुसार बदल केला होता, असा गौप्यस्फोट माजी गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी केल्यामुळे कॉंगे्रसमध्ये जबरदस्त भूकंप आला आहे. पिल्लई भाजपाचे पोपट असल्यासारखे बोलत आहेत, अशी सावरासावर कॉंगे्रसने केली, तर इशरत आणि अफजल गुरूवर कॉंगे्रसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपाने केली.
गुजरात पोलिसांनी २००४ मध्ये या अतिरेक्यांचा खात्मा केला होता. आयबी आणि अन्य गुप्तचर यंत्रणांच्या आधारावर इशरत ही तोयबाची मानवी बॉम्ब होती आणि तिच्यासोबत आलेले अन्य चारही जण तोयबाचे अतिरेकी होते, असे शपथपत्र २००९ मध्ये गुजरात उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. पण, त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या संपुआ सरकारने राजकीय फायद्यासाठी शपथपत्रात बदल केले होते, असा आरोप पिल्लई यांनी गुरुवार केला होता. यामुळे तिळपापड झालेल्या कॉंगे्रस नेत्यांनी पिल्लई यांनी हे वक्तव्य करण्यासाठी हीच वेळ का निवडली. गृहसचिव असताना ते काहीच का बोलले नाही. याचाच अर्थ ते भाजपाचे पोपट म्हणून बोलत आहेत, असा सवाल उपस्थित केला.
कॉंगे्रस नेत्या रेणुका चौधरी आणि प्रमोद तिवारी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणार्‍या पिल्लई यांच्या वेळेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. तर, भाजपा नेते आणि संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी इशरत व अफजल गुरूवरील आपली भूमिका कॉंगे्रसने आता स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, इशरत प्रकरणी पिल्लई यांच्या भूमिकेमुळे कॉंगे्रस पक्षाचा खरा चेहरा देशवासीयांपुढे आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26906

Posted by on Feb 27 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (808 of 2453 articles)


स्मृती इराणी यांच्या माफीची कॉंग्रेसची मागणी मी आस्थावान हिंदू, दुर्गामातेची उपासक नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ...

×