Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पीएफमधून ऑनलाईन मिळणार पैसे

पीएफमधून ऑनलाईन मिळणार पैसे

=मार्चअखेरपर्यंत योजना अंमलात येणार=
EPFO-Indiaनवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] – कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (पीएफ) आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी कार्यालयात जा, कागदोपत्रांची औपचारिकता पूर्ण करा, यासारख्या कटकटीपासून आता कायमचीच मुक्ती मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने आपल्या सुमारे पाच कोटी सदस्यांना पीएफचे पैसे ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलली असून, पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत ही योजना अंमलात येण्याची शक्यता आहे.
पीएफसह काही महत्त्वाच्या सरकारी योजनांसाठी आधार कार्ड ऐच्छिक असावे, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. त्यामुळे पीएफमधून ऑनलाईन पैसे काढण्याची सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नांना आणखी गती मिळाली आहे.
ईपीएफओचे पाच कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यांचे पैशाचे दावे निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करताना बरेच दिवस लागतात. पण, ऑनलाईन सुविधा अस्तित्वात आल्यानंतर सदस्याने अर्ज सादर करताच अवघ्या तीन तासांतच त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, अर्ज करण्यासाठी सदस्याला कार्यालयात जाण्याचीही गरज राहणार नाही. त्याला घरीच बसून ऑनलाईन अर्ज देता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त के. के. जालान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
ही सुविधा सर्वच पीएफ खातेधारकांना मिळावी, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही श्रम मंत्रालयाला लेखी विनंती केली आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या योजनांकरिता आधार कार्ड अनिवार्य केले जाऊ नये, असा निकाल दिला असल्याने श्रम मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत योजना देशभरात लागू होईल, असा आम्हाला विश्‍वास असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25158

Posted by on Oct 17 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1329 of 2453 articles)


आरटीआयचे उत्तर वेळीच द्यावे पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका सरकारी विभागांना दिला तीन ‘टी’चा मंत्र नवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] - राज्यकारभारातील ...

×