Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पीएफवरील प्रस्तावित कर मागे : जेटली

पीएफवरील प्रस्तावित कर मागे : जेटली

arun jaitley budget 2016 loksabhaनवी दिल्ली, [८ मार्च] – कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढल्यावर कर लावण्याचा प्रस्ताव अखेर सरकारने मागे घेतला आहे. प्रचंड गदारोळानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत याबाबतची घोषणा केली आहे.
नोकरदारांच्या गुंतवणूक वाढीसाठी सरकार त्यांच्या पीएफच्या काही रकमेवर कर लावण्याच्या विचारात होतं, मात्र याबाबत देशभरात बरीच आरडाओरडा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेटली यांना आपल्या प्रस्तावाचा फेरविचार करण्याची सूचना केली होती. त्यानंतर आज अरूण जेटलींनी ही घोषणा केली आहे.
ईपीएफ कर लावण्यामागे निवृत्ती योजना वाढवण्याचा उद्देश होता. विशेष करून खाजगी क्षेत्राम काम करणारे कर्मचारी ज्यांना पेंन्शनची काही उपाययोजना नसते, त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला होता असे अरूण जेटली यांनी सांगितले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून ६० टक्के रक्कम काढल्यास त्यावर कर लावण्याचा प्रस्ताव बजेटमध्ये मांडण्यात आला होता. मात्र यावर विरोधी पक्ष, कामगार संघटना आणि भाजपमधूनही मोठा विरोध झाला होता. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयात प्रस्तावित ईपीएफ टॅक्सबाबत एक उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली होती. या निर्णयाविरोधात लोकांनीही सोशल साईट्‌सच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला. त्यामुळे अखेर आज हा निर्णय मागे घेण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27111

Posted by on Mar 8 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (736 of 2453 articles)


नवी दिल्ली, [८ मार्च] - आज महिला दिनानिमित्त भारतीय हवाई दलाने महत्वाची घोषणा केली आहे. १८ जूनला भारतीय हवाई दलाला ...

×