Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पीएफ काढण्यासाठी शेवटचे १२ दिवसच शिल्लक

पीएफ काढण्यासाठी शेवटचे १२ दिवसच शिल्लक

EPFO-Indiaनवी दिल्ली, [१८ एप्रिल] – पीएफ काढण्यावर कर लावण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मागे घेतला असला, तरी पीएफमधील संपूर्ण रक्कम काढता येणार नाही, हा नियम कायम ठेवला असल्याने आणि त्याची अंमलबजावणी येत्या १ मे पासून होणार असल्याने ज्या कर्मचार्‍यांना आपल्या पीएफमधील पूर्ण रक्कम काढायची आहे, त्यांच्याकरिता आता केवळ १२ दिवसच शिल्लक राहिले आहेत.
येत्या ३० एप्रिलपर्यंत जे कर्मचारी पीएफमधील रक्कम काढणार नाही, त्यांना या रकमेसाठी वयाची ५८ वर्षे पूर्ण होण्याची अर्थात निवृत्तीपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
केंद्राने गेल्या महिन्यात पीएफ काढण्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पण, नोकरदार वर्ग आणि कामगार संघटनांनी त्यास सडकून विरोध केल्यानंतर सरकारने तो मागे घेतला होता. त्याचवेळी पीएफच्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्यावर मात्र निर्बंध कायम ठेवले होते. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्याबाबत कामगार मंत्रालयाने नवीन नियम तयार केले आहेत. यात पीएफमधील रक्कम काढण्यावर काही प्रमाणात मर्यादा आणण्यात आल्या आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार, कर्मचार्‍याने नोकरीचा राजीनामा दिला आणि तो दोन महिने बेरोजगार राहिला, तर त्याला पीएफमधील पूर्ण रक्कम काढण्याचा अधिकार होता. पण, नव्या नियमानुसार अशा बेरोजगार व्यक्तीला केवळ त्याच्या पीएफमध्ये पगारातून जमा झालेली रक्कमच मिळू शकणार आहे. मालक किंवा कपंनीकडून जमा करण्यात आलेली रक्कम त्याला काढता येणार नाही.
महिलांना सवलत
कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्याबाबत महिलांना मात्र विशेष सवलत दिली आहे. यानुसार कोणतीही महिला विवाह, गरोदरपणा किंवा बाळाचा जन्म या कारणांमुळे नोकरी सोडत असेल, तर ती पीएफमधील रक्कम दोन महिन्यांनंतरही पूर्णपणे काढू शकणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27868

Posted by on Apr 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (476 of 2453 articles)


=जनजीवनावर कुठलाही परिणाम नाही= अहमदाबाद, [१८ एप्रिल] - ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे आणि देशद्रोहाचा आरोपी असलेल्या हार्दिक पटेलची मुक्तता करण्यात ...

×