Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पीओकेमध्ये तिरंगा फडकविणार : जितेंद्रसिंह

पीओकेमध्ये तिरंगा फडकविणार : जितेंद्रसिंह

  • तिरंगा यात्रेला जम्मूतून प्रारंभ
  • पाकव्याप्त काश्मीरसाठी एक लढाई बाकी

Jitendra Singh1जम्मू, [१३ ऑगस्ट] – पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज शनिवारी जम्मू जिल्ह्यातील पाक सीमेला लागून असलेल्या सांबा सेक्टरमधून तिरंगा यात्रेला प्रारंभ केला. पाकव्याप्त काश्मीर हे भारताचेच असल्याने तेथील नागरिकांच्या मुक्ततेसाठी आपल्याला स्वातंत्र्याचा आणखी एक लढा लढायचा आहे. लवकरच आपण मुझफ्फराबादेत तिरंगा फडकविणार आहोत, असे जितेंद्र सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मिरातील तीन लोकसभा मतदारसंघात तिरंगा यात्रा २२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या यात्रेसाठी जितेंद्र सिंह आज सकाळीच दिल्लीहून जम्मूत दाखल झाले.
तिरंगा यात्रेचा प्रारंभ करताना काश्मिरातील उधमपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले जितेंद्र सिंह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मिरातील नागरिक पाक सरकार आणि अतिरेक्यांच्या अत्याचारामुळे त्रस्त झाले आहेत. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे आणि त्यासाठी आपल्याला आणखी एक लढाई लढावीच लागणार आहे. कोटली आणि मुझफ्फराबाद येथे आपण जेव्हा तिरंगा फडकवू त्याचवेळी आपल्याला खर्‍या अर्थाने पूर्णपणे स्वातंत्र्य मिळेल. पाकव्याप्त काश्मीरसोबतच गिलगिट आणि बलुचिस्तान येथील नागरिकांना न्याय मिळवून देणे हेच आपले कर्तव्य आहे. तसेच, पाकच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही प्रांतांमध्ये पाक सरकारकडून होत असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाकडेही जगाचे लक्ष वेधायचे आहे.
पाकव्याप्त काश्मीर हे जम्मू-काश्मीरचेच अंग असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य करणार नाही, असा विश्‍वास पाकव्याप्त काश्मिरातील आणि जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना आहे. त्यांचा हा विश्‍वास सार्थकी लावायचा आहे, असे जितेंद्र सिंह म्हणाले.
किरेन रिजिजूही काढणार यात्रा
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू हे देखील उद्या रविवारी जम्मू-काश्मीरच्या लडाख येथून तिरंगा यात्रा काढणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथक लेहला दाखल झाले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29209

Posted by on Aug 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (119 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] - गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी फेबु्रवारी महिन्यात संसदेत सादर होणार्‍या रेल्वे अर्थसंकल्पाचे हे कदाचित शेवटचे ...

×