Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पीक विमा योजना शेतकर्‍यांच्या फायद्याची: तोमर

पीक विमा योजना शेतकर्‍यांच्या फायद्याची: तोमर

=भाजपा किसान मोर्चा पाळणार किसान जागरण सप्ताह=
vijay pal tomarनवी दिल्ली, [१६ जानेवारी] – ९ ते १५ मार्चदरम्यान देशभर किसान जागरण सप्ताह पाळण्यात येणार असल्याचे भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयपालसिंह तोमर यांनी आज एका पत्रपरिषदेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांसाठी घोषित केलेल्या शेतकरी पीक विमा योजनेचे स्वागत करताना तोमर म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी लाभदायक अशी पीक विमा योजना लागू करण्याची मागणी किसान मोर्चाच्या ११ आणि १२ जानेवारीला झालेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, कृषिमंत्री राधामोहनसिंह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने पीक विमा योजनेची घोषणा केली. ही योजना शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे.
आधीच्या पीक विमा योजनेत प्रिमियम दर जास्त होता आणि नुकसानभरपाईची राशी अतिशय तोकडी होती. नव्या पीक विमा योजनेत प्रिमियम दर कमी करत नुकसान भरपाईच्या राशीत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नुकसान भरपाई तातडीने देण्याची तरतूद करण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधत तोमर म्हणाले की, विशेष म्हणजे शेतातून पीक कापल्यानंतरही होणार्‍या नुकसानीची भरपाई नव्या योजनेत करण्यात आली आहे.
शेतकर्‍यांच्या फायद्याची पीक विमा योजना लागू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी किसान जागरण सप्ताहात धन्यवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे स्पष्ट करत तोमर म्हणाले की, या सप्ताहाच्या माध्यमातून केंद्र आणि भाजपाशासित राज्यातील उपलब्धी शेतकर्‍यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. किसान मोर्चाच्या आगामी कार्यक्रमांची माहिती देताना तोमर म्हणाले की, २० ते ३१ जानेवारी दरम्यान देशातील सर्व राज्यात किसान मोर्चाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत किसान मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे १ ते ५ फेब्रुवारीपर्यंत देशातील सर्व जिल्ह्यात किसान मोर्चाच्या जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील कोणत्याही सरकारने शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी अशी पीकविमा योजना आणली नाही, जशी मोदी सरकारने आणली, याकडे लक्ष वेधत तोमर म्हणाले की, किसान मोर्चा नेहमीच शेतकर्‍यांच्या हितासाठी संघर्ष करत राहणार आहे.
पत्रपरिषदेला भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि किसान मोर्चाचे प्रभारी सतपाल मलिक उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26540

Posted by on Jan 17 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (903 of 2453 articles)


=ब्रिटनच्या वेबसाईटवर खुलासा= लंडन, [१६ जानेवारी] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुढ अजूनही कायम असताना आणि त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळे ...

×