Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पी. चिदम्बरम यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध?

पी. चिदम्बरम यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध?

=सुब्रमण्यम स्वामी यांची चौकशीची मागणी=
SUBRAMANIAN_SWAMYनवी दिल्ली, [१ मार्च] – कॉंगे्रसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री पी.चिदम्बरम यांचे पाकच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
इशरत जहॉं ही महिला दहशतवादी गुजरात पोलिसांच्या चकमकीत मारली गेली होती. २००९ साली केंद्र सरकारने दाखल केलेल्या शपथपत्रातील बदलासाठी चिदंबरम यांनी पुढाकार घेतल्याची माहिती त्यावेळचे गृहसचिव जी. के. पिल्ले यांनी दिल्यानंतर, गृह व परराष्ट्र मंत्रालयाने याची सखोल चौकशी सुरू केली आहे. भारतीय कायद्यानुसार हा प्रकार गंभीर गुन्हा या सदरात मोडत असल्याने, खरोखरच पी.चिदम्बरम यांचे दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का, याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी चिदम्बरम यांच्यावर आवश्यक कारवाई करण्यासाठी, पंतप्रधानांनी महाधिवक्ता यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सूचना करावी, अशीही सूचना स्वामी यांनी मोदी यांना नुकतीच केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26981

Posted by on Mar 2 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (784 of 2453 articles)


=शेतकर्‍यांच्या तोंडाला पुसली पाने= नवी दिल्ली, [१ मार्च] - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातून आकड्यांची हेराफेरी करीत शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने ...

×