Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पुढच्या वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसारच व्हावी : शिवसेना

पुढच्या वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसारच व्हावी : शिवसेना

मुंबई, [१९ फेब्रुवारी] – सरकारी शिवजयंती पुढच्या वर्षी तिथीनुसारच साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
त्याचबरोबर तिथीप्रमाणे होणार्‍या शिवजयंतीला सरकारी सुट्‌टी जाहीर करावी, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे. राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. मात्र, यंदा शासनाच्या निर्णयाप्रमाणे शिवसेनेचे मंत्री तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत.
आज शिवजयंतीनिमित्त महापौर बंगल्यावर कार्यक्रम झाला. यावेळी शिवाजी पार्कातल्या महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला पालकमंत्री, राज्यपाल सी विद्यासागर राव, महापौर स्नेहल आंबेकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापालिका आयुक्त सिताराम कुंटे आदी उपस्थित होते. पुढच्या वर्षी तिथीप्रमाणे शासकीय शिवजयंती उत्सव होईल आणि सुटीही असेल याबाबत शिवसेना प्रयत्नशील आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांचं स्मरण करत, टि्‌वटरवरून महाराजांना वंदन केलंय.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20750

Posted by on Feb 20 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (2036 of 2451 articles)


बरेली, [१९ फेब्रुवारी] - आगामी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे भाड्यात घट करण्याचे प्रयोजन नसल्याचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे. ...

×