Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पुढील चार वर्षे युरियाचे दर स्थिर

पुढील चार वर्षे युरियाचे दर स्थिर

=केंद्राचा शेतकर्‍यांना मोठा दिलासा : एकनाथ खडसे यांची माहिती=
EKNATH KHADSE7नवी दिल्ली, [१५ जून] – अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता कमी पावसाचा अंदाज अशा विविध संकटांच्या मालिकेत सापडलेल्या देशभरातील शेतकर्‍यांना केंद्र सरकारने आज सोमवारी मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांना नुकसानीतून काही प्रमाणात सावरता यावे, यासाठी पुढील चार वर्षे युरियाचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंंद्राच्या या निर्णयामुळे पुढील चार वर्षात युरियाच्या एका पिशवीचे दर १७८ ते १८० रुपये कायम राहणार आहेत, असे केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले होते. केंद्राच्या या निर्णयाची माहिती राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
युरियाचे दर स्थिर ठेवण्यासोबतच, मिश्र खतांच्या किमतीही पुढील पाच वर्षे स्थिर राखण्यासाठी या खतांवर दिली जाणारी सबसिडी कमी न करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याचे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. सोबतच, शेतमालाच्या मापात घोटाळा करणार्‍या व्यापार्‍यांवर कठोर करण्यात येईल, असा इशाराही खडसे यांनी यावेळी दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22939

Posted by on Jun 16 2015. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1613 of 2453 articles)


=सिंचन घोटाळा= मुंबई, [१५ जून] - राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) आपल्या आजवरच्या ...

×