Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पुढील वर्षी जीएसटी पारित होईल

पुढील वर्षी जीएसटी पारित होईल

=पंतप्रधानांचा विश्‍वास=
narendra-modi-513नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] – देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असलेले वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक पुढील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनातच पारित होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी येथे व्यक्त केला.
भारत आणि जर्मनीतील व्यावसायिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सरकारने जीएसटी विधेयक संसदेत सादर केले आहे. लोकसभेत ते पारितही झाले. राज्यसभेतही या विधेयकाचा मार्ग आता मोकळा होईल, अशी आशा आहे.
गुंतवणूकदारांच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी आपल्या सरकारने ठोस पावले उचलली आहेत. गुंतवणूकदारांना देशात कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. गेल्या १५ महिन्यांच्या काळात सरकारने जी पावले उचलली आहेत, त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांच्या मनात भारताविषयी विश्‍वास आणि आदराची भावना निर्माण झाली आहे. आता आपले सरकार संरक्षण क्षेत्रातही गुंतवणूक वाढविण्यासाठी काही ठोस पावले उचलत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आधी संरक्षण उद्योगातील परवान्यांची वैधता १८ महिन्यांचीच होती. ती आम्ही तीन वर्षांची केली आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25013

Posted by on Oct 7 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1367 of 2453 articles)


=‘झी मीडिया’चा सर्वेक्षणातून दावा= नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] - बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. सभा आणि ...

×