Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पुढील वर्षी भारताचा ८ टक्के दराने विकास

पुढील वर्षी भारताचा ८ टक्के दराने विकास

=ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूकचा अहवाल=
world-economic-outlookमुंबई, [२२ मार्च] – पुढील आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा दर किमान आठ टक्के इतका राहील आणि २०१६-१७ या वर्षात हा दर ८.३ टक्क्यांच्या घरात जाईल, असा विश्‍वास ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूकच्या अहवालात व्यक्त करण्यात आला.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ‘ब्रिक्स’ राष्ट्रसमुहात आर्थिक आघाडीवर झपाट्याने विकास करीत असलेला भारत हा एकमेव देश आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ या वर्षात भारताचा विकास दर ८ टक्के आणि त्यानंतरच्या वर्षात हाच दर ८.३ टक्के असा राहील. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम धडाडीने राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना मिळाली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारतीय अर्थव्यवस्थेचे सकारात्मक चित्र रेखाटले आहे. याच आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
यापूर्वी, याच संस्थेने २०१५-१६ या वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के आणि त्यानंतरच्या वर्षातील विकास दर ६.८ टक्के इतका राहील, असे भाकीत केले होते, हे विशेष! आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन लेगार्ड यांनीही चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७.२ टक्के राहील आणि २०१९ पर्यंत भारत जपान व जर्मनीलाही मागे टाकेल, असा विश्‍वास व्यक्त केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21668

Posted by on Mar 23 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1860 of 2453 articles)


अमृतसर, [२२ मार्च] - जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रविवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला इशारा देताना, ‘कारगिल युद्ध विसरून ...

×