Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » पुढील वर्षी हवेत एक लाख कोटी : जेटली

पुढील वर्षी हवेत एक लाख कोटी : जेटली

=सातवा वेतन आयोग, वन रँक वन पेन्शन=
arun-jaitley2नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – माजी सैनिकांची ‘वन रँक वन पेन्शन’ आणि केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात १.१० लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची आवश्यकता असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी दिली.
अर्थमंत्रालयाशी संलग्न असलेल्या सल्लागार समितीच्या बैठकीला संबोधित करताना जेटली म्हणाले की, २०१६-१७ या आर्थिक वर्षात वन रँक वन पेन्शन आणि सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचे दायित्व पूर्ण करण्यासाठी इतक्या निधीची तरतूद करावीच लागणार आहे.
सध्या आर्थिक विकास ज्या गतीने सुरू आहे, त्यापेक्षाही जास्त गतीने विकास करण्याची क्षमता आपल्या देशात आहे. कुठे अपुर्‍या, तर कुठे फार जास्त पावसामुळे गेल्या दोन वर्षांपासून देशाच्या कृषी क्षेत्राला पाहिजे तशी कामगिरी करता आलेली नाही. देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ पडल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या काळात या राज्यांना दुष्काळावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करावा लागला, याकडेही जेटली यांनी लक्ष वेधले. कृषी उत्पादन वाढविण्यासोबतच कृषीची उत्पादनक्षमताही वाढविण्यासाठी सरकार आणखी काही ठोस पावले उचलत आहे. सध्या संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था अतिशय कठीण काळातून वाटचाल करीत आहे. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी नीचांकावर आल्यामुळे भारतातील सुक्ष्म अर्थव्यवस्थेची स्थिती मजबूत झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26738

Posted by on Feb 7 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (856 of 2453 articles)


=पंतप्रधानांचा गांधी घराण्यावर घणाघाती हल्ला= मोरान, [५ फेब्रुवारी] - २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रस पक्षाचा दारुण पराभव झाल्याने, या पक्षाच्या ...

×