Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पुत्रप्रेमात आईने पक्ष व देशाचे वाटोळे केले

पुत्रप्रेमात आईने पक्ष व देशाचे वाटोळे केले

=एम. जे. अकबर यांचा घणाघात=
mj akbar pressmeetनवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आईवरील प्रेम निव्वळ देखावा असल्याचा आरोप कॉंगे्रसने केल्यानंतर, भाजपाने या पक्षावर घणाघाती हल्ला चढविला. पुत्रप्रेमात आंधळी झालेल्या एका आईने पक्षाचे आणि देशाचेही वाटोळे केले, अस पलटवार भाजपने सोमवारी केला.
कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे बिघडलेले आणि विध्वंसक मनोवृत्तीचे आहेत आणि त्यांच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या त्यांच्या आईने पक्षाचे तर अतोनात नुकसान केलेच, आता देशाचेही नुकसान करीत आहे, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते एम. जे. अकबर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आपण लहानपणी चहा विकायचो आणि आपली आई लोकांच्या घरात भांडी घासायची, असे नरेंद्र मोदी सांगतात. पण, त्यात सत्यता नाही, असा आरोप कॉंगे्रसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केल्यानंतर, भाजपाने लगेचच हा हल्ला चढविला.
नरेंद्र मोदी ज्या देशांचा दौरा करतात, तिथे भारतीयांचा उत्साह द्विगुणीत होत आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी भारतीय नागरिक प्रचंड गर्दी करीत आहेत. ही गर्दी स्वेच्छेने होत असून, भाजपाने ती पैसे देऊन बोलावलेली नाही, असा चिमटाही अकबर यांनी काढला. राहुल गांधी अमेरिकेत काय करीत आहेत, ते रजेवर आहेत का, असा सवालही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक दौर्‍यावर कॉंगे्रस पक्ष टीका करीत असतो. पण, मोदी यांचा प्रत्येक परदेश दौरा देशहिताचा असतो, अर्थव्यवस्था मजबूत करणारा असतो, याचा विसर कॉंगे्रसला पडलेला आहे. संपुआ सरकारच्या काळात कॉंगे्रस पक्षाचे परराष्ट्र धोरण अतिशय कमकुवत होते. पण, मोदी सरकारचे धोरण जगाला आपलेसे करणारे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले

Short URL: https://vrittabharati.in/?p=24100

Posted by on Sep 29 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1395 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] - अंकेक्षण अहवाल आणि आयकर विवरण सादर करण्यास मुदतवाढ देणारा कोणताही आदेश आयकर खात्याने जारी केलेला ...

×