Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पुरस्कार परत घेण्याचे साहित्य अकादमीचे आवाहन

पुरस्कार परत घेण्याचे साहित्य अकादमीचे आवाहन

Sahitya-Akademi-award_2014नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – गेल्या काही दिवसात लेखक आणि विचारवंतांच्या झालेल्या हत्येचा निषेध करत या हत्येच्या निषेधात आपले पुरस्कार परत करणार्‍या देशभरातील साहित्यिकांना आपले पुरस्कार परत घेण्याचे आवाहन आज साहित्य अकादमीने केले.
एम. एम. कलबर्गी आणि अन्य साहित्यिक तसेच विचारवंतांच्या हत्येनंतर तसेच काहींवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून देशभरातील ५० साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी आपले पुरस्कार साहित्य अकादमीला परत केले होते. साहित्य अकादमी याची दखल घेत नसल्यामुळे साहित्य वर्तुळात नाराजीचे वातावरण होतेे. आपले बर्‍याच दिवसांचे मौन तोडत साहित्य अकादमीच्या आज झालेल्या बैठकीत कलबर्गी यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला.
साहित्य अकादमीच्या आज झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीला २४ पैकी २० सदस्य उपस्थित होते. अशा प्रकारच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलावी, असे आवाहन करतांना वाढत्या असहिष्णूतेच्या विरोधात पुरस्कार परत करणार्‍या लेखकांना पुरस्कार परत घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. साहित्य अकादमीच्या कार्यकारी समितीचे सदस्य कृष्णास्वामी नचिमुथू यांनी याबाबतची माहिती बैठकीनंतर दिली.
वाढत्या असहिष्णूतेच्या विरोधात साहित्य अकादमीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार्‍या सदस्यांनी राजीनामे परत घेण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
साहित्य अकादमीच्या कार्यालयासमोर आज सकाळपासूनच तणावाचे वातावरण होतेे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या भावनांची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांनी धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले होतेे. एक निषेध मोर्चाही यावेळी काढण्यात आला.
दुसरीकडे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांच्या दबावाला साहित्य अकादमीने बळी पडू नये, असे आवाहनही राष्ट्रभक्त साहित्यिकांच्या दुसर्‍या गटातर्फे करण्यात आले. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी हा सारा प्रकार राजकीय हेतूने सुरू असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रभक्त साहित्यिकांच्या गटातर्फे करण्यात आला.
जम्मू-काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचे स्थलांतर सुरू होते, पंजाबमध्ये दहशतवाद जेव्हा जोरावर होता आणि हिंदूंवर अत्याचार सुरू होते, तेव्हा तसेच आणिबाणीच्या काळात देशभर दडपशाही सुरू असताना पुरस्कार परत का करण्यात आले नाही, अशी विचारणा राष्ट्रवादी गटातर्फे करण्यात येत होती.
साहित्यिकांचा एक गट स्वत:ला राष्ट्रवादी तर दुसरा प्रगतिशील म्हणवून घेत होता. दोन्ही गट समोरासमोर असल्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कोणतीही अनुचित घटना घडली नाही. यावेळी साहित्य अकादमीच्या कार्यालयासमोर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25269

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1298 of 2453 articles)


=आयातदारांनी ठेवली केंद्रापुढे अट= नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] - सध्या तूर डाळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने केंद्राने डाळींच्या साठ्याची मर्यादा ...

×