Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेलच्या अबकारी शुल्कात वाढ

पेट्रोल, डिझेलच्या अबकारी शुल्कात वाढ

=सरकारला मिळणार ४४०० कोटींचा महसूल, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कुठलीही वाढ नाही=
CustomLogo-SpotColorनवी दिल्ली, [२ जानेवारी] – केंद्र सरकारने आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी शुल्कात वाढ जाहीर केली. अवघ्या दोन आठवड्यातील ही दुसरी दरवाढ असून, यामुळे सरकारच्या तिजोरीत ४४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होणार आहे.
पेट्रोलच्या प्रति लिटर अबकारी शुल्कात ३७ पैशांची आणि डिझेलच्या शुल्कात दोन रुपयांची वाढ करण्यात आली. तथापि, अबकारी शुल्कातील वाढीमुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कुठलीही वाढ होणार नसल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असताना, तेल कंपन्यांनी १ जानेवारी रोजी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत अतिशय कमी कपात केली होती. त्यामुळे अबकारी शुल्कातील वाढीचा भार ग्राहकांवर न टाकण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
सरकारने यापूर्वी १७ डिसेंबर रोजी पेट्रोलच्या प्रति लिटर अबकारी शुल्कात ३० पैशांची आणि डिझेलच्या अबकारी शुल्कात १.१७ रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत २५०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26380

Posted by on Jan 3 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (949 of 2453 articles)


=भाजपाचा आरोप= नवी दिल्ली, [२ जानेवारी] - पाकिस्तानसोबत सरकारने जी शांतता प्रक्रिया सुरू केली आहे, ती एका हल्ल्याने थांबणार नाही, ...

×