Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ

petrol-diesel pumpनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याचे सत्र सुरूच राहिल्याने, त्याचा फटका आज शनिवारी देशवासीयांना बसला आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत ३.१८ आणि डिझेलच्या किमतीत ३.०९ रुपयांची वाढ जाहीर केली. शनिवारी मध्यरात्रीपासूनच हे नवे दर लागू झाले.
फेब्रुवारी महिन्यात झालेली ही सलग दुसरी दरवाढ आहे. तत्पूर्वी पेट्रोलच्या किमतीत सलग दहावेळा आणि डिझेलच्या किमतीत सहावेळा कपात करण्यात आली होती. ऑगस्टपासून जानेवारी अखेरपर्यंत पेट्रोल १७.११ रुपयांनी आणि ऑक्टोबरपासून डिझेल १२.९६ रुपयांनी स्वस्त झाले होते. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत गेल्याने १६ फेबु्रवारी रोजी पेट्रोल ८२ आणि डिझेल ६१ पैशाने महाग झाले होते. त्यानंतर आज शनिवारी पुन्हा एकदा या दोन्ही इंधनांच्या किमतीत वाढ करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयात होत असलेल्या घसरणीचा फटकाही भारताला सहन करावा लागला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या निर्यातीचा भारताचा खर्च वाढला आणि तो भरून काढण्यासाठी ही दरवाढ अनिवार्य झाली असल्याचे तेल कंपन्यांच्या सूत्राने सांगितले. स्थानिक कर किंवा व्हॅटचा यात समावेश करण्यात आला नसल्याने प्रत्यक्षात ही दरवाढ यापेक्षाही जास्त राहणार आहे, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20974

Posted by on Mar 1 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1997 of 2453 articles)


न्यूयॉर्क, [२८ फेब्रुवारी] - अमेरिकेत थंडीने कहर केला आहे. आतापर्यंत फेब्रुवारीमध्ये सर्वात जास्त हिवाळा राहिला आहे. अमेरिकेमध्ये थंडीने मागील ६५ ...

×